बावनकुळेंनी केलेल्या काळ्या धंद्यामुळेच भाजपने त्यांचे तिकीट कापले - वडेट्टीवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vijay wadettiwar criticized bjp leader chandrashekhar bawankule in chandrapur

चंद्रशेखर बावनकुळे मंत्री असताना केलेले धंदे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना माहित आहे. त्यामुळेच त्यांचे तिकीट कापले. माझ्यावर केलेले आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावे. सत्ता गेल्यानंतर भाजपचे नेते वायफळ बडबड करीत आहे. लोकांची दिशाभूल करणे, हाच एकमेव उद्योग सध्या त्यांच्याकडे आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे,

बावनकुळेंनी केलेल्या काळ्या धंद्यामुळेच भाजपने त्यांचे तिकीट कापले - वडेट्टीवार

चंद्रपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता दारू आणि वाळू तस्करीवरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे सुरू आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार  यांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. दुसरीकडे वडेट्टीवार यांनी बावनकुळे मंत्री असताना केलेल्या कामांची आठवण करून देत त्यामुळेच तुमची पक्षाने तिकीट कापली, असा टोला लावला. निवडणुकीच्या प्रचारात पदवीधरांच्या प्रश्‍नांवर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, प्रचाराची पातळी दारू आणि वाळू तस्करीपर्यंत घसरली. 

हेही वाचा - मेळघाटवर स्थलांतराचे काळे ढग; स्थानिक स्तरावर रोजगाराचा अभाव

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एनडी हॉटेल येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पदवीधरांच्या प्रश्‍नांवर बोलण्याऐवजी बावनकुळे यांनी जिल्ह्यातील वाळू आणि दारू तस्करीच्या अनुषंगाने वडेट्टीवारांवर तोफ डागली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हे वाटून घेतले आहे. वाळू तस्करीचे अलिखित आदेश दिले. कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवायच्या नाही, असा दम जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना दिला आहे, असा आरोप त्यांनी केला. दारूबंदीचा निर्णय झाला. परंतु, सध्या कठोर अंमलबजावणी होत नाही. बाटली मागे नेते कमिशन घेत आहेत. दारूबंदी उठविता येणार नाही. ते उठविण्याचे पाप करू नये. मात्र, राज्यात दारूबंदीच्या समर्थनार्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. युती शासनाच्या काळात दारूबंदीसाठी कडक कायदे केले. परंतु, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दारूतस्करांना खुली सूट मिळाली आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आमदार बंटी भांगडिया, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते. 

हेही वाचा - Video : पीकसंरक्षणासाठी चक्क शेतीला लावले साड्यांचे कुंपण; गिरीधर वसाके यांची अभिनव...

...म्हणून बावनकुळेंना घरी बसविले - वडेट्टीवार
चंद्रशेखर बावनकुळे मंत्री असताना केलेले धंदे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना माहित आहे. त्यामुळेच त्यांचे तिकीट कापले. माझ्यावर केलेले आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावे. सत्ता गेल्यानंतर भाजपचे नेते वायफळ बडबड करीत आहे. लोकांची दिशाभूल करणे, हाच एकमेव उद्योग सध्या त्यांच्याकडे आहे. कोराडी येथील जगदंबा ट्रान्स्पोर्ट आणि जगदंबा कन्स्ट्रक्‍शन कुणाची आहे? त्यांना वाळूचा पुरवठा कुणाकडून होतो, याची माहिती बावनकुळेंना असेल अशा शब्दांत वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिले. युती शासनाच्या काळात अवैध धंदे सुरू होते. स्वत: भाजप नेते दारू आणि वाळूच्या तस्करीत गुंतले होते. आम्ही स्वत: दारू सुरू करण्याची मागणी करीत आहे. आजही मूल आणि पोंभुर्णा येथील वाळूघाटांतून तस्करी सुरू आहे. ते माणसे कुणाची आहे. बावनकुळेंनी याची माहिती घ्यावी, असे आव्हान वडेट्टीवारांना दिले. 

loading image
go to top