Maharashtra vidhansabha 2019 : विकास ठाकरे म्हणाले, चापलुसांना उमेदवारी दिल्यास अर्ज भरू देणार नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नागपूर : पाच वर्षांपूर्वी मतदारसंघात निवडणूक लढविल्यावर कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारे अनेक चापलुस दिल्लीत उमेदवारीसाठी ठाण मांडून बसले आहेत. पक्ष वाढविणाऱ्या निष्ठावंतांना डावलून चापलुसांना उमेदवारी दिल्यास त्यांना अर्ज भरू देणार नाही, असा इशारा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिला.

देवडिया भवन येथे आयोजित राज्याचे माजी महाधिवक्ता ऍड. श्रीहरी अणे यांच्या कॉंग्रेस कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. पक्षांमध्ये चाटुगिरी करणाऱ्याची संख्या वाढली आहे. निवडणुकांमध्ये कार्यकर्ता काम करतो. पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतो. मात्र, पाच वर्षे जनतेकडे पाठ फिरवून दिल्लीत रमणारा नेता लादला जातो. त्याचे काम करावे लागते. दुसरीकडे येथील समस्या काय?, कोणाच्या पाठीशी जनता उभी आहे याकडे दुर्लक्ष करून दिल्लीत यादी फायनल केली जाते. दिल्लीतील नेत्याची सभा नागपुरात असल्यास हजारोंची गर्दी जमविण्यासाठी सामान्य कार्यकर्ता मेहनत घेतो. मात्र, स्टेजवर चमकूगिरी करणारे नेते बसलेले असतात. पक्षाने याचा विचार करावा. आता यादी ठरविताना येथील जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मते दिल्लीतील नेत्यांनी जाणून घ्यावी. जातीय समीकरणे लक्षात घ्यावी. विदर्भाच्या प्रश्‍नांना महत्त्व देण्याची गरज आहे. पक्षाच्या या भूमिकेने कार्यकर्ते नाराज होत आहेत. ते कुठेतरी पक्षाने लक्षात घ्यावे. त्यांच्या कामाचे मूल्यांकन करावे, असे विकास ठाकरे म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikas Thackeray said, if you give a candidature to the chapalus, he will not fill the application