आता हे बनले कोरोना वारियर्स; सुरक्षा कवच मात्र मिळेना

korona 1.jpg
korona 1.jpg
Updated on

नांदुरा (जि. बुलडाणा) : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एवढीच ग्रामस्तरावरील सर्व जोखीम पत्करून कोरोनाच्या लढाईत राज्यातील ग्रामसेवकांनी जनहितार्थ झोकून दिले असून, ते शेवटच्या घटकातील जनतेसाठी मैदानात उतरून कोरोनासाठी वारीयर्स बनले असताना त्यांना कोणत्याच प्रकारचे सुरक्षा कवच नसल्याने राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांचे आरोग्य धोक्यात येते की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा कवच
सद्या सर्व जगाला हादरून सोडणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गावखेड्यापर्यंत पोहचला असून, सर्व स्तरातून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जनजागृती केली जात आहे. यासाठी आरोग्य व पंचायत विभाग दक्ष असून, जागतिक आरोग्य संघटनेकडून येणाऱ्या सूचनांचे पालन केले जात आहे. यासाठी होमग्राऊंडवर आरोग्य विभाग येत असल्याने त्या कर्मचाऱ्यांकरिता 50 लाख रुपयांचे विमा कवच शासनाकडून त्यांना दिले गेले आहे. त्यांच्या पाठोपाठच ग्रामसेवक हा घटकही ग्रामीण जनतेची नाळ असल्याने जोखीम शिरावर घेऊन राज्यातील जवळपास 22 हजार ग्रामसेवकांनी या कामी झोकून दिले आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना ज्या प्रमाणे 50 लाखाचे आरोग्य कवच शासनाने विम्याच्या माध्यमातून जाहीर केले आहे. तसेच कवच फिल्डवर काम करणाऱ्या राज्यातील सर्व ग्रामसेवकाना द्यावे अशी मागणी ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, राज्य सरचिटनीस प्रशांत जामोदे, सूचित खरात, भास्करराव जाधव, बापूसाहेब अहिरे, कैलास वाकचौरे, सचिन वाटकर, मीनाक्षी बनसोड आदींनी केले आहे.

ग्रामसेवकांची सद्यस्थितीतील कार्ये
-कोरोनाविषयी गावात जनजागृती करणे.
-गाव सफाई, स्वच्छता मोहीम राबविणे.
-पिण्याचा शुद्ध पाणीपूरवठा करणे.
-घरोघरी भेटी देऊन बाहेरगावावरून आलेल्यांची नोंद घेणे व ही माहिती आरोग्य विभागाला पुरविणे.
-गावात डायपोक्लोराईडची फवारणी करणे.
-गावात क्वारंटाइन व्यक्ती असतील तर त्यांच्या संबंधात येणाऱ्यांचे समुपदेशन व विलगीकरण करणे.
-आठवडी बाजार बंद करून घरपोच भाजीपाला व दूध मिळण्याची व्यवस्था करून देणे.
-गर्दी टाळण्यासाठी ठराविक अंतरावर ग्रामस्थांना उभे राहण्यासाठी पांढरे पट्टे, वर्तुळ आखणे.

काम करण्याची सक्ती पण सुविधांपासून वंचित
शासनाने एकीकडे कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता कर्मचाऱ्यांना 5 टक्के उपस्थितीचे फर्मान बजावले असताना ग्रामसेवकांनी मुख्यालय सोडू नये असे आदेश पारीत केले आहेत. ग्रामपातळीवरील समिती असलेल्या कोरोना मुक्तीसाठी योगदान द्यावे असेही आदेश असल्याने ग्रामसेवक घटकांचा संपर्क हा जनतेसाठी कळीचा मुद्दा राहत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यासारखाच वावर या घटकाला करावा लागत असताना आरोग्य कर्मचाऱ्याला 50 लाखाच्या सुरक्षाचे कवच तर ग्रामसेवकांच्या अशा सुविधांपासून वंचित ठेवल्या जात असल्याने ग्रामसेवक युनियनमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.

ग्रामसेवकांनाही मिळावे विमा कवच
आरोग्य कर्मचाऱ्यानंतर थेट लोकांशी संपर्क येणारा घटक हा ग्रामसेवक असतानाही आरोग्याच्या दृष्टीने सद्या कोणतेही सुरक्षा कवच शासनाने उपलब्ध करून दिलेले नाही. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन विनासुट्टी जनतेच्या गाऱ्हाणी समजवून घेत असताना जवळचा संपर्क येत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्याप्रमाणेच ग्रामसेवकांनाही विम्याचे सुरक्षा कवच असावे अशी आमची मागणी आहे.
-प्रशांत जामोदे, राज्य सरचिटणीस, ग्रामसेवक युनीयन म. राज्य. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com