
या गावाला अजून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला नाही. हा दर्जा मिळण्यासाठी येथील नागरिक गत 20 वर्षांपासून लढा देत आहेत. ग्रामपंचायतीचा दर्जा नसल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे
कारंजा (घा.) (जि.वर्धा) : देशात शहरांसोबत आता गावांचाही विकास होऊ लागला आहे. प्रत्येक गाव आता डिजिटल होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. पण वर्धा जिल्ह्यातील येनगाव मार्गावर असलेल्या खैरी (पुनर्वसन) या वसाहतीमधील नागरिकांना अजूनही सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीये.
या गावाला अजून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला नाही. हा दर्जा मिळण्यासाठी येथील नागरिक गत 20 वर्षांपासून लढा देत आहेत. ग्रामपंचायतीचा दर्जा नसल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे
हेही वाचा - राम मंदिराची निर्मिती राजस्थानातील दगडातून; पाकिस्तान, बांगलादेशमधील रामभक्तांचीही...
.
सन दोन हजार मध्ये खैरी हे गाव कार नदी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आल्यामुळे कारंजा येथील येनगाव मार्गावर खैरी गावाचे स्थलांतर करण्यात आले होते. तेव्हापासून येथील सहाशे अठ्ठयानऊ लोकसंख्या असलेले नागरिक हे मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. अनेकदा येथील नागरिकांनी विविध आंदोलन करत स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या दर्जाची मागणी केली. पण, खैरी पुनर्वसन गावाकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष करत ग्रामपंचायतचा दर्जा दिला नाही. येथील नागरिक हे 18 नागरी सुविधेपासून गत अनेक वर्षापासून वंचित आहे. मूलभूत सोयी सुविधा नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
येथील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. गावाला ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा याकरिता 1 जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा कार नदी प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, कारंजा यांना पाठविण्यात आल्या आहे. या निवेदनावर कार नदी प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष एकनाथ डोबले, सचिव संजय पाठे यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहे.
हेही वाचा - देशाची वाटचाल हुकमशाहीकडे; राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार...
स्मशानभूमीची झाली दयनीय अवस्था
येथील नागरिकांकरिता येनगाव रस्त्यावर स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आली आहे पण, सध्या या स्मशानभूमीची दयनीय अवस्था झालेली आहे. स्मशानभूमीच्या शेडच्या टिना तुटल्या असून उन्हाळयात व पावसाळयात येथे अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला यातना सहन कराव्या लागतात. स्मशानभूमिच्या
संपादन - अथर्व महांकाळ