दिग्रस तालुक्‍यातील गावे करण्यात आली सील, हे आहे कारण...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

इसापूर येथील तीन व रुई (तलाव) येथील एक असे चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने 60 दिवसांच्या लॉकडाउन काळात बुधवारी खळबळ उडाली. पुसद तालुक्‍यातील निंबी, हुडी, दिग्रस तालुक्‍यातील इसापूर व रुई तलाव तर महागाव तालुक्‍यातील माळकिन्ही येथे हे रुग्ण आढळले. हे सर्व जण मुंबईहून सोबत आलेले असून, एकाच वाहनातून त्यांनी प्रवास केल्याची माहिती आहे.

दिग्रस, पुसद : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचे प्रमाण शहरी भागात असताना आता ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. दिग्रस, पुसद तालुक्‍यात प्रत्येकी चार तर महागाव तालुक्‍यात एक असे एकूण एकाच दिवशी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे दिग्रस तालुक्‍यातील पाच गावे सील करण्यात आली आहे. पुसद तालुक्‍यातील हुडीनंतर निंबी येथेही गावबंदी करण्यात आली आहे. तर, संपर्कातील लोकांना विलगीकरणात दाखल करण्यात आले.

इसापूर येथील तीन व रुई (तलाव) येथील एक असे चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने 60 दिवसांच्या लॉकडाउन काळात बुधवारी खळबळ उडाली. पुसद तालुक्‍यातील निंबी, हुडी, दिग्रस तालुक्‍यातील इसापूर व रुई तलाव तर महागाव तालुक्‍यातील माळकिन्ही येथे हे रुग्ण आढळले. हे सर्व जण मुंबईहून सोबत आलेले असून, एकाच वाहनातून त्यांनी प्रवास केल्याची माहिती आहे.

संपर्कातील लोक विलगीकरण कक्षात

ही गावे बुधवारी रात्रीच सील करण्यात आली. गुरुवारी (ता.21) सकाळीच इसापूर व रूईला पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इसापूर येथील एकाच परिवारातील तीन जण असून त्यात एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. तर एकजण रुई(तलाव) येथील आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल, तहसीलदार राजेश वजीरे, ठाणेदार सोनाजी आम्ले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा बानोत, गटविकास अधिकारी राजेश खारोडे, मुख्याधिकारी शेषराव टाले, डॉ.अभय गोविंदवार, ओम खोडे, सरपंच निर्मला धनसावंत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मोठी रूई,मरसूळ तांडा व इसापूर गटग्रामपंचायत असलेले दत्तापूर ही पाच गाव सील करण्यात आली.

पुसद तालुक्‍यातील तालुक्‍यातील हुडी गावासह निंबी येथील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आज निंबी गाव सील करण्यात आले. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या निंबी येथील सरपंचासह 49 व्यक्ती स्वेच्छेने आयुर्वेद महाविद्यालयातील संस्थात्मक क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आले. सकाळपासूनच निंबी गावात संचारबंदी लावण्यात आली. कवडीपूर व निंबी गावाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले. सकाळी आरोग्य यंत्रणेच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली.

अवश्य वाचा - कॅन्सरग्रस्त चिमुकलीवर शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांचा खर्च; बाप झाला हतबल...मदतीचे आवाहन

रॅपिड सर्वेक्षण, फ्युअर कॅम्प उभारण्यात आला. गावचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.यावेळी गावाला उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, गटविकास अधिकारी शिवाजी गवई, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, वाहतूक शाखेचे ब्रिजपल सिंह ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशीष पवार यांनी भेटी दिल्या.

मुंबई वरून परतलेल्या मजुरांच्या माध्यमातुन कोरोनाने तालुक्‍याच्या ग्रामीण भागात शिरकाव केल्याने प्रशासनासह नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांना शिक्के मारून होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. असे नागरिक घराबाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
- राजेश वजीरे, तहसीलदार, दिग्रस.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: villeges sealed due to corona suspected