"व्हीव्हीआयपी' रसिकांवर लाठीमार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नागपूर - नागपूरकर रसिकांसाठी नागपूर महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या महापालिकेचे मनसुबे आज पोलिसांनी उधळून लावले. "व्हीव्हीआयपी'च्या प्रवेशद्वारावर गर्दीला हाताळण्याचे कसब न दाखविता पोलिसांनी महिला रसिकांवर लाठीमार केला. एवढेच नव्हे स्टेडियममध्ये रसिकांना सोडण्याची विनंती करण्यास आलेल्या महापौर, आयुक्तांसह शहरातील काही आमदारांसोबतही मुजोरी करीत पोलिस, बाऊन्सरने त्यांची अब्रूच वेशीवर टांगली.

नागपूर - नागपूरकर रसिकांसाठी नागपूर महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या महापालिकेचे मनसुबे आज पोलिसांनी उधळून लावले. "व्हीव्हीआयपी'च्या प्रवेशद्वारावर गर्दीला हाताळण्याचे कसब न दाखविता पोलिसांनी महिला रसिकांवर लाठीमार केला. एवढेच नव्हे स्टेडियममध्ये रसिकांना सोडण्याची विनंती करण्यास आलेल्या महापौर, आयुक्तांसह शहरातील काही आमदारांसोबतही मुजोरी करीत पोलिस, बाऊन्सरने त्यांची अब्रूच वेशीवर टांगली.

नागपूर महोत्सवात "कट्यार ते कजरारे' या संगीतमय कार्यक्रमासाठी यशवंत स्टेडियमवर अलोट गर्दी झाली. विशेषतः "व्हीव्हीआयपी'साठी प्रवेशद्वारावर चांगलीच रेटारेटी झाली. कार्यक्रमाची वेळ साडेसहाची असताना पोलिसांनी पाच वाजतापासूनच नागरिकांना आत सोडले. यात प्रामुख्याने पोलिसांनी स्वतःच्याच कुटुंबीयांना आत सोडल्याचे आयोजकांमधील काहींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काही व्हीव्हीआयपींना रोखून धरल्याने सुरुवातीला परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी पोलिसांना विनंती केली. परंतु, त्यांचे न ऐकल्याने महापौर प्रवीण दटके येथे आले. परंतु पोलिस, बाऊन्सरने त्यांचेही ऐकले नाही. आमदार परिणय फुके हेही प्रवेशद्वारावर आले. पण, काहीही परिणाम झाला नाही. परिणामी विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, नगरसेविका चेतना टांक, माजी उपमहापौर संदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना बाहेरच ताटकळत उभे राहावे लागले. एवढेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाही स्टेडियममागील रस्त्याने आतमध्ये यावे लागले. "व्हीव्हीआयपी'च्या प्रवेशद्वारावर तरुण, तरुणींसह वृद्ध व महिलांही आतमध्ये शिरण्यासाठी पोलिसांना विनंती करीत होत्या. परंतु, पोलिसांनी त्यांना गर्दी आहे, जागाच नाही, असे सांगून आतमध्ये सोडण्यास नकार दिला. मात्र, स्वतःच्या कुटुंबीयांना, सोयऱ्यांना आतमध्ये सोडताना पोलिस दिसून आले.

आयुक्तांना खुर्चीही नाही
बाहेर पोलिसांचा तमाशा सुरू असतानाच आतमध्ये आयोजकांचाही गोंधळ दिसून आला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बसण्यासही आसन नसल्याने त्यांनी नगरसेवक गिरीश देशमुख यांच्यासोबत एकआसनी खुर्ची "शेअर' केली. अखेर आयोजकाला लाज आल्याने त्याने त्यांना खुर्ची दिली.

पत्रकार, छायाचित्रकारांनाही रोखले
या कार्यक्रमाच्या वृत्तांकनासाठी आलेले पत्रकार, छायाचित्रकारांनाही पोलिसांनी व्हीव्हीआयपी प्रवेशद्वारावर रोखून धरले. या वेळी काही पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. मनपाने व्हीव्हीआयपीच्या प्रवेश शुल्क देऊन आमंत्रित केलेले संपादक, ज्येष्ठ पत्रकारांनाही परत जावे लागले.

Web Title: VIPs" of his fans, beating