file photo
file photo

जानेवारीपासून धावेल विशाखापट्टणम-नवी दिल्ली एक्‍स्प्रेस 

नागपूर  : रेल्वे मंत्रालयाने नागपूरमार्गे धावणाऱ्या नवी दिल्ली-विशाखापट्टणम-नवी दिल्ली साप्ताहिक सुपरफास्ट वातानुकूलित एक्‍स्प्रेस या नव्या रेल्वेगाडीची घोषणा केली. नागपूरमार्गे धावणारी नवी गाडी म्हणजे रेल्वे मंत्रालयाने दिलेली दिवाळी भेट आहे. 
20805 विशाखापट्टणम-नवी दिल्ली वातानुकूलित सुपरफास्ट साप्ताहिक एक्‍स्प्रेस 23 जानेवारीपासून नियमित स्वरूपात चालविण्यात येईल. प्रत्येक गुरुवारी रात्री 10 वाजता ही गाडी विशाखापट्टणमहून रवाना होईल आणि शुक्रवारी दुपारी 3.05 वाजता नागपूर स्थानक गाठेल. ही गाडी शनिवारी सकाळी 6.35 वाजता नवी दिल्ली स्थानकावर पोहोचेल. तसेच 20806 नवी दिल्ली-विशाखापट्टणम वातानुकूलित सुपरफास्ट साप्ताहिक एक्‍स्प्रेस 25 जानेवारीपासून धावेल. प्रत्येक शनिवारी रात्री 8.15 वाजता नवी दिल्लीहून रवाना होणारी ही गाडी रविवारी सकाळी 11.25 वाजता नागपूर स्थानक गाठेल आणि सोमवारी पहाटे 5.05 वाजता विशाखापट्टणम स्थानक गाठेल. या गाडीला दुववाडा, अनंकापल्ले, सामलकोट, राजमुंद्री, टाडेपल्लीगुदेम, एलुरू, विजयवाडा, खम्मम, वारंगल, पेड्डापल्ली, रामगुंडम, सिरपूर कागजनगर, बल्लारशा, चंद्रपूर, नागपूर, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, आगरा 
स्थानकावर थांबा दिला आहे. लांब पल्ल्याच्या या गाडीला पाच द्वितीय श्रेणी वातानुकूलित तर सात तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे राहतील. 
नागपूरमार्गे मुंबई-शालिमार पूजा स्पेशल 
नागपूर : दिवाळी सुट्यांमुळे रेल्वेगाड्या "हाउसफुल्ल' धावत आहेत. त्यातच छटपूजा असल्याने गर्दीत भर पडणार आहे. ही बाब लक्षात घेता नागपूरमार्गे मुंबई-शालिमार-मुंबई पूजा स्पेशल एक्‍स्प्रेस चालविण्यात येणार आहे. 82111 मुंबई-शालिमार स्पेशल गाडी 1 व 8 नोव्हेंबरला मुंबईहून मध्यरात्री 12.20 वाजता रवाना होईल. दुपारी 1.45 वाजता नागपूर स्थानक गाठेल आणि शनिवारी सकाळी 9.30 वाजता शालिमार स्थानकावर पोहोचेल. तसेच 82112 शालिमार-मुंबई पूजा स्पेशल एक्‍स्प्रेस 2 व 9 नोव्हेंबरला दुपारी 12.10 वाजता शालिमार येथून परतीच्या प्रवासाला निघेल. दुसऱ्या दिवशी सकाळ 6.55 वाजता नागपूर स्थानक गाठेल आणि रात्री 11.50 वाजता मुंबई स्थानक गाठेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, चाम्पा, रायगड, झारसुगुडा, राउलकेला, चक्रधरपूर, टाटानगर, संत्रारगाछी स्थानकावर थांबा दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com