धापेवाडा येथे विठ्ठलनामाचा गजर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

धापेवाडा (जि. नागपूर) : विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या धापेवाडा येथे आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी (ता. 12) स्वयंभू विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जवळपास एक लाख भाविक दर्शनासाठी आले होते. तसेच शंभर दिंड्यांचा सहभाग होता. टाळ-मृदुंगाच्या गजरात परिसरात विठ्ठलनामाचा गजर झाला.

शुक्रवारी पहाटे पाच वाजता विठ्ठल-रुक्‍मिणीची महापूजा व अभिषेक संजय धापोडकर यांच्या हस्ते पार पडला. यानंतर मंदिराची दारे भाविकांसाठी खुले करण्यात आले. भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाच्या वतीने वैद्यकीय, पाण्याची व्यवस्था करण्यात आली. 16 व 17 जुलैला पौर्णिमेनिमित्त यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. 16) चंद्रग्रहण असल्यामुळे दुपारी तीनपासून वेध सुरू होणार आहे. त्यामुळे मंदिराचे द्वार बंद राहील. बुधवारी (ता. 17) पहाटे महापूजा होईल. यानंतर मंदिराचे कपाट उघडण्यात येईल, याची भाविकांनी नोंद घ्यावी.
भाविकांनी दर्शनासाठी गर्दी
टाकळघाट : येथील कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळपासून मंदिरामध्ये भजन व कीर्तन सुरू होते. गावातील मुख्य मार्गानी निघालेल्या मिरवणुकीत भजन मंडळ, महिला, युवा मंडळी आकर्षक वेशभूषा करून सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा गजर करीत महिला मंडळी निनादत होत्या. मिरवणुकीत ज्येष्ठ मंडळींसह तरुण वर्ग व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडीच्या स्वागतासाठी घरांसमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली. शेवटी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर येथे दिंडीचा समारोप झाला

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vitthal rukhmai news