अकोला महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

विनाेदला कामाने तारले
गेल्या निवडणुकीत विनाेद मापारी हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले हाेते. मतभेदाच्या राजकारणात त्यांना पक्ष साेडावा लागला हाेता. या निवडणूकीत भाजपने त्यांना संधी दिली. उपमहापौर असतांना त्यांनी केलेल्या विकास कामामुळे लाडक्या विनाेदला जनतेने पुन्हा भरघाेस मतांनी निवडून दिले. 

अकाेला - अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक समजल्या जाणाऱ्या अकाेला महापालिकेवर अखेर ‘कमळ’ फुलले. महापालिका निवडणूकीत भाजपला बहुमत मिळाले असून सर्वाधिक ४८ जागा मिळाल्या तर काॅंग्रेसला १३ जागांवर समाधान मानावे लागले.

गत महिनाभरापासून सुरू असलेल्या अकाेला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष ‘एकला चलाे रे’ चा नारा देत निवडणुकीच्या मैदानात स्वबळावर उतरल्याने सर्वच पक्षांसाठी ही निवडणुक अटीतटीची ठरली. भाजप-शिवसेनेच्या युतीचा काडीमाेड झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने महापालिकेची सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली हाेती. भाजप नेत्यांनी ग्राऊंड लेव्हलवर केलेल्या निवडणुकीच्या नियाेजनबद्ध अाखणीमुळे तब्बल सात प्रभागात भाजपचे चार नगरसेवकांचे पॅनल विजयी झाले. महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचे अठ्ठेचाळीस नगरसेवक विजयी झाले असून एकहाती सत्ता ताब्यात घेणारा भाजप पहिला पक्ष ठरला अाहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली वातावरण निर्मिती केवळ हवाच ठरली अाहे. गतवेळी एवढेच पाच नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून अाले अाहेत. तर गटा-तटाच्या राजकारणामुळे काँग्रेसची पिछेहाट झाली असून अठरा वरून तेरा नगरसेवकांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले. भाजपशी युती ताेडत स्वबळाचा नारा देत डरकाळी फाेडणाऱ्या शिवसेनेची डरकाळी काही प्रभागापुरतीच सिमीत राहिली. सेनेला या निवडणुकीत फारशी समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. सेनेचे गतवेळी एवढेच अाठ नगरसेवक विजयी झाले. संपूर्ण महाराष्ट्रात साेशल इंजिनिअरींगचा प्रयाेग करणाऱ्या भारिप बमसंला या निवडणुकीत माेठा धक्का बसला. सात नगरसेवक असणाऱ्या भारिपचे केवळ तीन नगरसेवक विजयी झाले अाहेत. प्रभाग क्रमांक तीनचे विद्यमान नगरसेवक बबलु जगताप अाणि नगरसेविका धनश्री देव अभ्यंकर पुन्हा विजयी झाले अाहेत. तर भारिपच्या इतर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे प्रभाग नऊ मधून एमअायएमचे माेहम्मद मुस्तफा माेहम्मद युसूफ यांनी महापालिकेत एन्ट्री करित अकाेला महापालिकेत एमअायएमचा पहिला नगरसेवक हाेण्याचा मान मिळविला. तर मनसेचे इंजिन चाकाविनाच राहिले. 

विनाेदला कामाने तारले
गेल्या निवडणुकीत विनाेद मापारी हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले हाेते. मतभेदाच्या राजकारणात त्यांना पक्ष साेडावा लागला हाेता. या निवडणूकीत भाजपने त्यांना संधी दिली. उपमहापौर असतांना त्यांनी केलेल्या विकास कामामुळे लाडक्या विनाेदला जनतेने पुन्हा भरघाेस मतांनी निवडून दिले. 

असे मिळाले पक्षीय बलाबल
भाजप - 48
काॅंग्रेस - 13
शिवसेना - 08
राष्ट्रवादी काॅंग्रेस - 05
भारीप बमसं - 03
एमआयएम - 01
अपक्ष - 02

एकुण - 80

#VoteTrendLive

Web Title: #VoteTrendLive bjp wins in Akola Municipal corporation