I Will Vote : मतदान करणे हक्कासह राष्ट्रकर्तव्यही!

विवेक मेतकर
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

अकोला : मुक्त व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखून या निवडणूकीसह येणाऱ्या प्रत्येक निवडणूकांमध्ये निर्भयपणे मतदान करण्याची शपथ आरएलटी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने नवमतदार जागृती अभियानात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. ‘सकाळ’च्या ‘आय विल व्होट’ या उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. या वेळी महाविद्यालयाचे प्राध्यपक वृंदांनी ‘सकाळ’च्या आय विल वोट या उपक्रमाचे भरभरून कौतुक करताना विद्यार्थ्यांनाही मतदान करण्यास प्रेरीत केले.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात महिलांचा अर्धा वाटा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून महिला सक्रीय नसल्याचे बरेचदा बोलल्या जाते. मात्र, संसदीय कार्यप्रणालीत महिलांनीही भरीव कामगिरी केली आहे. मात्र, तुम्हाला कोणताही उमेदवार पसंत नसल्यास ‘नोटा’ हा नवा अधिकारही प्राप्त झाला आहे.
- प्रा.सोनाली गावंडे (नाचने)

परीश्रम करून आपल्या ताटात अन्न पूरविणाऱ्या बळीराजाकडे लक्ष देणारे सरकार निवडायचे आहे. रात्रंदिवस सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना बळ देणारा लोकप्रतिनिधी हवा. महिला सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
- डॉ.सुधीर कोहचाडे

तरुणांना योग्य वेळी रोजगाराच्या संधी मिळाल्या, तर संपूर्ण पिढीचा विकास होईल. रोजगाराची संधी, व्यवसायवृद्धीसाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- प्रतिक काटे

मतदान हा आपला हक्क आहे. त्यातून एक चांगले सरकार आपण देऊ शकतो. त्यामुळे तो हक्क बजावणे आवश्‍यक आहे. निवडलेला लोकप्रतिनिधी कामे करीत नसल्यास तुमच्या अधिकाराने त्याला घरी बसविता येऊ शकते.
- दिव्यानी मुळतकर

समाज, राज्य आणि देशाचा विकासासाठी आवश्‍यक असलेल्या सरकारची निवड करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. तो बजावून देशाच्या विकासाला हातभार लावा.
- शुभांगी म्हात्रे

महिला सुरक्षेसंदर्भात कडक व त्वरित शिक्षा देणारे कायदे व्हावेत. आणि त्याची अंमलबजावणीही होणे गरजेचे आहे, तरच स्त्रियांवरील अत्याचार थांबतील.
- तेजस्विनी नेमाडे

देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी लोकशाही मतदानाचा अधिकार दिला आहे. त्याचा वापर करुन योग्य उमेदवाराची निवड करावी. जेणेकरून तो आपला मतदारसंघ आणि देशाचा विकास करेल.
- श्रृती बंड

मतदानासाठी प्रत्येकाने आग्रही असावे. सुजाण नागरिक म्हणून राज्यकर्ते निवडण्याची संधी आपल्या हातात आहे. मतदान अधिकारच नाही तर ते कर्तव्य सुध्दा आहे.
- अक्षय घोपे

Web Title: voting appeal at akola by students