‘गावोगावी जाईन म्हणतो, मतदानाचे गीत गाईन म्हणतो!

शुभम बायस्कार
मंगळवार, 16 एप्रिल 2019

अकोला : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकशाहीच्या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या प्रक्रियेपासून कुणीही वंचित राहू नये, मतदान शंभर टक्के व्हावे यासाठी भौरद येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी (ता. 16) चक्क मराठमोळ्या वेशात येऊन त्यांनी  येथील मध्यवर्ती बसस्थानकात मतदान जनजागृती करून लोकांना लोकशाहीच्या महोत्सवाचे महत्त्व पटून दिले. 

अकोला : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकशाहीच्या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या प्रक्रियेपासून कुणीही वंचित राहू नये, मतदान शंभर टक्के व्हावे यासाठी भौरद येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी (ता. 16) चक्क मराठमोळ्या वेशात येऊन त्यांनी  येथील मध्यवर्ती बसस्थानकात मतदान जनजागृती करून लोकांना लोकशाहीच्या महोत्सवाचे महत्त्व पटून दिले. 

राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात मतदानाचा टक्का कमी असतो. तो वाढावा; सर्वांना मतदानाचे महत्त्व पटावे यासाठी अकोला शहराला लागून असलेल्या भाैरद येथील शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्याच्या विविध भागात मतदान जनजागृती करण्याविषयी परवानगी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांना प्रतिसाद दिला. त्यानूसार देशमुख यांनी मंगळवारी येथील मध्यवर्ती बसस्थानकात मराठमोळा वेश परिधान करून मदतान जनजागृती केली. हातात माईक घेऊन लोकांचे लक्ष वेधून ‘सारी कामे बाजूला,, चला चला रे मतदानाला’, ‘आद्य कर्तव्य भारतीयांचे; पवित्र कार्य मतदानाचे’ यासह त्यांनी विविध घोष वाक्यांनी मतदानाला जाण्याचा प्रवाशांना आग्रह धरला. फलटाफलटा वर जाऊन लोकांशी चर्चा केली. तसेच देशमुख यांनी प्रवाशी महिला, पुरुष, तरूणांना मतदानचे महत्त्व पटवून दिले. प्रवाशांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मतदान करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या कामात त्यांचे सहकारी शिक्षक रामचरण राठोड त्यांना सहकार्य करीत आहेत. 

जिल्ह्याच्या विविध भागात जनजागृती
जनजागृती करणारे सर्जेराव देशमुख हे पेशाने मुख्याध्यापक आहेत. ते  भाैरद येथील माध्यमिक शाळेवर अध्यापनाचे कार्य करतात. मागिल अनेक वर्षांपासून लोकशाहिच्या पवित्र यज्ञात नागरिकांनी शंभरटक्के सहभाही व्हावे यासाठी ते मतदान जनजगृती करतात. तसेच त्यांची दिल्ली येथेसुद्धा मतदान जनजागृतीसाठी निवड झालेली आहे. मतदानाच्या महाउत्सवाला सुरुवात होताच त्यांनी अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा, बार्शीटाकळी यासह जिल्ह्याच्या विविध भागात भ्रमंती करून  नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. 

लोकशाहिच्या पवित्र उत्सवासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी गावोगावी जाऊन मतदान जनजगृती करीत आहे; लोकांनी शंभर टक्के मतदान करण्यासाठी पुढे यावे. लोकशाहीला बळकट करावे.
- सर्जेराव देशमुख, मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, भाैरद

Web Title: voting awareness by school principal in akola