नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील मतदान संपले

File photo
File photo

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्‍यातील मतदान संपले. सुरक्षेच्या कारणावरून प्रशासनाने येथे तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ निश्‍चित केली होती.
जिलह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 34.20 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्या. एटापल्ली तालुक्‍यात निवडणूक कामावर असलेल्या शिक्षकाचा फिट आल्याने मृत्यू झाला. मतदानाच्या पूर्वसंध्येला अहेरी विधानसभेतील अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, भामरागड या पाच तालुक्‍यांत मुसळधार पाऊस पडला. तरीदेखील नागरिकांनी तुडूंब भरलेले नदी-नाले पार करत जीव धोक्‍यात घालून मतदान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com