खातेदारांनो थांबा, साहेब जेवण करीत आहेत!

 कोंढाळी ः बॅंकेचे प्रवेशद्वार बंद केल्यानंतर ग्राहकांची झालेली गर्दी.
कोंढाळी ः बॅंकेचे प्रवेशद्वार बंद केल्यानंतर ग्राहकांची झालेली गर्दी.

कोंढाळी (जि.नागपूर)ः नागपूर-अमरावती महामार्गावरील 20 हजार लोकसंख्येच्या गावात 80 टक्‍के नागरिकांचे येथील बॅंक ऑफ इंडिया शाखेत खाते असून येथील कर्मचारी दुपारी दोन वाजताच आतील ग्राहकांना बाहेर काढून बॅंक कर्मचारी सुरक्षारक्षकासह एकत्रित मस्त भोजन करतात. कॉन्ट्रॅक्‍ट बेसवर असलेला कर्मचारी गेटवर उभा राहतो. असा प्रकार अनेक दिवसांपासून येथे चालू असल्याची ग्राहकांची ओरड आहे. असाच नित्याचा प्रकार बुधवारी (ता. 27) दुपारी घडला.

सुरक्षा अधिकारी करतो खासगी काम
अनेक ग्राहक बॅंकेत गेले असता भोजन अवकाशाची वेळ असल्याचे सांगून दोन वाजता बॅकेच्या मुख्य गेटला कुलूप लावले होते. महिला ग्राहकांनी विचारणा केली असता भोजन अवकाश आहे, त्यामुळे गेट बंद करण्यात आले आहे, असे प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्याने उत्तर दिले. ग्राहक नाइलाजाने परत कुठेतरी पानटपरीवर जाऊन बसले. एका वयोवृद्ध महिलेसह असलेल्या काही महिला गेटच्या बाजूला आडोसा घेत वाट पाहत बसल्या. एवढा लाजिरवाणा प्रकार कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांशी येथे सुरू आहे. ज्यांचे बॅंकेत पैसे जमा आहेत, त्या ग्राहकांना बॅंक कर्मचाऱ्यांकडून अशी वागणूक मिळते. सुरक्षारक्षक नेहमीच गेटवर हजर न राहता तो खांद्यावरील बंदूक बाजूला ठेवून आत कर्मचाऱ्यांची कामे करतो. त्यामुळे सुरक्षारक्षक केवळ नावाचाच असल्याचे ग्राहक सांगतात. या सर्व प्रकाराची वरिष्ठ बॅंक प्रबंधक अधिकाऱ्यांनी बॅंक व्यवस्थापनाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी येथील खातेदारांनी केली, तसेच कर्मचारी व सुरक्षारक्षक यांची वागणूक येथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून पाहता येईल व सत्यता दिसून येईल, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

आम्ही भोजन करत असताना बॅंकेत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गेटला कुलूप लावून बंद करण्यात येते.
श्री. लांडगे
बॅंकेचे शाखा व्यवस्थापक  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com