रोबोट युनिटसाठी निधीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : मेडिकलमधील रोबोटिक शस्त्रक्रिया विभागाला सरकारने दीड वर्षापूर्वी मान्यता दिली. निधीअभावी विभागाचे काम रखडले होते. मात्र, 18 कोटींच्या खर्चाला मान्यता मिळाली. खनन विभागाकडून निधी वळता झाला, मात्र मेडिकलच्या तिजोरीत अद्याप पोहोचला नसल्याची माहिती पुढे आली. फेब्रुवारी 2019 पर्यंत हा विभाग उभारण्यात येणार होता. मात्र, अद्याप निधीची प्रतीक्षा आहे.

नागपूर : मेडिकलमधील रोबोटिक शस्त्रक्रिया विभागाला सरकारने दीड वर्षापूर्वी मान्यता दिली. निधीअभावी विभागाचे काम रखडले होते. मात्र, 18 कोटींच्या खर्चाला मान्यता मिळाली. खनन विभागाकडून निधी वळता झाला, मात्र मेडिकलच्या तिजोरीत अद्याप पोहोचला नसल्याची माहिती पुढे आली. फेब्रुवारी 2019 पर्यंत हा विभाग उभारण्यात येणार होता. मात्र, अद्याप निधीची प्रतीक्षा आहे.
मेडिकलच्या सर्जरीच्या शस्त्रक्रियागारात तयार होणाऱ्या रोबोटिक शस्त्रक्रिया विभागाला जिल्हा नियोजन समितीने 18 कोटींची मान्यता दिली. खनन विभागाकडून हा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, यादरम्यान शासनाने सर्जिकल साहित्यासह औषधांच्या खरेदीपर्यंत सर्व अधिकार "हाफकिन'ला दिले. मात्र, हा निधी हाफकिनच्या तिजोरीत जाणार नसल्याची शक्‍यता आहे. 28 नोव्हेंबरला मुंबईत रोबोटिक युनिटवर बैठक झाली. यात मेडिकलच्या रोबोटिक सर्जरी युनिटचा मार्ग मोकळा करण्यात आला होता.
..
रोबोटिक तंत्राचा उपयोग
रोबोटिक तंत्रामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या स्नायूंची मोठी चिरफाड होत नाही. मानवी हाताने होणाऱ्या शस्त्रक्रियांच्या तुलनेत यांत्रिक रोबोट शरीरात 360 अंशापर्यंत फिरतो. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होतात. यांत्रिकी पद्धतीने टाके लावण्याची प्रक्रिया सुलभ असते. शस्त्रक्रियेदरम्यान रक्त कमी प्रमाणात वाया जाते. वेदनांपासूनही मुक्ती मिळते. रुग्ण लवकर बरा होतो. भारतात सध्या सुमारे 100 शस्त्रक्रिया करणारे यांत्रिक रोबोट आहेत. यातील बहुतांश पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई व दिल्लीच्या खासगी रुग्णालयांत आहे.
मेडिकलमध्ये बहुतांश लेप्रोस्कोपीच्या शस्त्रक्रिया यांत्रिकी पद्धतीने झाल्यास शस्त्रक्रियांची संख्याही वाढेल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नातून हा विभाग सुरू होत आहे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात सर्जरी विभागात युनिट उभारण्यात येईल. खनन विभागाकडून निधी वळता केला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अल्पावधीत हा निधी मेडिकलला वळता करण्यात येईल. यांत्रिक रोबोटद्वारे गरिबांना शस्त्रक्रियांचा लाभ होईल.
- डॉ. राज गजभिये, विभागप्रमुख, सर्जरी विभाग

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for funding for a robot unit