"उपजिल्हा' रुग्णालयाची प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

लाखांदूर (भंडारा) : औषधोपचारात लाखांदूरचे ग्रामीण रुग्णालय अव्वल ठरले आहे. मात्र, अनेक समस्यांनी रुग्णालय वेढलेले असल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रुग्णालयातील एक्‍सरे मशीन, सोनोग्राफी मशीन बंद असून शीतगृहाअभावी लघुरक्तपेढी निकामी ठरत आहे. अशातच ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचे आश्‍वासन मिळाले होते. मात्र, या आश्‍वासनाची पूर्तता झाली नाही. यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 

लाखांदूर (भंडारा) : औषधोपचारात लाखांदूरचे ग्रामीण रुग्णालय अव्वल ठरले आहे. मात्र, अनेक समस्यांनी रुग्णालय वेढलेले असल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रुग्णालयातील एक्‍सरे मशीन, सोनोग्राफी मशीन बंद असून शीतगृहाअभावी लघुरक्तपेढी निकामी ठरत आहे. अशातच ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचे आश्‍वासन मिळाले होते. मात्र, या आश्‍वासनाची पूर्तता झाली नाही. यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 
तालुक्‍यातील सुमारे 89 गावांचा समावेश असलेल्या जवळपास केवळ 30 खाटांचीच रुग्ण सुविधा ग्रामीण रुग्णालयात अस्तित्वात आहे. तालुक्‍यात रुग्णांना प्राथमिक औषधोपचार मिळावा, यासाठी दिघोरी, बारव्हा, सरांडी/बु. व कुडेगाव आदी गावांत प्राथमिक आरोग्य केंद्रेदेखील अस्तित्वात आहेत. मात्र, या आरोग्य केंद्रांतर्गत प्रथमोपचार दिल्यानंतर सर्वच रुग्णांना लाखांदुरातील ग्रामीण रुग्णालयात भरतीदाखल पाठविले जात असल्याची माहिती आहे. नानाविध आजाराने त्रस्त रुग्णांना शासन सोयीनुसार आरोग्य सुविधा पुरविताना अपघातात जखमींसह प्रसूतिपूर्व महिलांनादेखील लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयातच दाखल केले जात असल्याचे वास्तव आहे. 
दरम्यान, मागील 1-2 वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची पुरेशी पदे या रुग्णालयात उपलब्ध केली गेली असली तरी अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. रुग्णांना आधुनिक आरोग्यसेवा मिळण्यासाठी शासनाकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. या रुग्णालयातील एक्‍सरे मशीन तंत्रज्ञाअभावी बंद पडली असता कोणत्याही लोकप्रतिनिधीने अद्यापही दखल घेतली नाही. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासूनची आहे. ग्रामीण रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी सोनोग्राफी मशीनसह लघुरक्तपेढीची सुविधा मंजूर करण्यात आली. मात्र ही सुविधादेखील अद्याप कार्यान्वित केली गेली नसल्याने लाखांदूरवासींचे उपजिल्हा रुग्णालयाचे स्वप्न भंगले आहे. 

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सदनिका भंगारात 
20 वर्षांपूर्वी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी निवासी सोय उपलब्ध व्हावी, यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सदनिकांचे बांधकाम करण्यात आले. सदर सदनिकांचे बांधकाम ग्रामीण रुग्णालयापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर लाखांदूर- साकोली मार्गालगत करण्यात आले. आरोग्य विभागात कार्यरत तत्कालीन व सध्याच्या कर्मचाऱ्यांत शासनांतर्गत निवासी सुविधा उपलब्ध झाल्याचा आनंद होता. मात्र, ज्या भागात शासनाअंतर्गत सदनिकांचे बांधकाम करण्यात आले त्या परिसरात सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांसह रस्त्याचे, पाणी सुविधेचे व विद्युतीकरणाचे काम अद्याप झाले नसल्याने या विभागातील कोणी कर्मचारी सदनिकांत राहत नाही. परिणामी, या सदनिका भंगारात पडल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for "Upazila 'Hospita