भिंती वाढविणार शहराचे आकर्षण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नागपूर - रस्त्यांच्या कडेवरील भिंतींही शहराच्या आकर्षणात भर घालू शकतात. त्यासाठी 18 डिसेंबर रोजी "वॉल आर्ट व ग्राफिटी' स्पर्धा घेण्यात येणार आहे. नागपूर महोत्सवादरम्यान भिंतीवर संदेश देणारे चित्र रंगवून शहराचे आकर्षण वाढविण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर प्रवीण दटके यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

नागपूर - रस्त्यांच्या कडेवरील भिंतींही शहराच्या आकर्षणात भर घालू शकतात. त्यासाठी 18 डिसेंबर रोजी "वॉल आर्ट व ग्राफिटी' स्पर्धा घेण्यात येणार आहे. नागपूर महोत्सवादरम्यान भिंतीवर संदेश देणारे चित्र रंगवून शहराचे आकर्षण वाढविण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर प्रवीण दटके यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

शहरात प्रवेश करणाऱ्यांना रस्त्यालगतच्या भिंती सुशोभित दिसाव्यात, यासाठी नागरिकांच्या सहभागातून स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि हौशी कलावंत अशा दोन गटांत स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत किमान चौघांची टिम भाग घेऊ शकेल. या चमूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्पर्धकांना प्रवेश अर्ज मनपाच्या दहाही झोन कार्यालयांसह पालिका मुख्यालयाच्या अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांच्या कार्यालयात उद्यापासून 10 डिसेंबरला दुपारी दोन वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्जाच्या पहिल्या क्रमांकावर टीमचे प्रतिनिधित्व नावाचा उल्लेख करणे चसेच टीममधील स्पर्धकांच्या ओळखपत्राच्या प्रती जोडणे आवश्‍यक आहे. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 10,000, 7500 तर 5000 रुपये रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. दोघांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येईल. ही स्पर्धा तज्ज्ञ परीक्षकांच्या निरीक्षणाखाली पार पडणार आहे. या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त जयंत दांडेगावकर आदी उपस्थित होते. 

संकल्पना तपासणार 

या भिंतीवर स्वच्छ भारत, बेटी बचाव-बेटी पढाओ, डिजिटल नागपूर, स्मार्ट सिटी नागपूर, हॅपी नागपूर, क्‍लिन ऍण्ड ग्रीन नागपूर, सेव्ह वॉटर, सस्टेनेबल नागपूर या विषयावर चित्रे काढायची आहेत. परंतु, कुणीही आपत्तीजनक चित्र काढू नये, यासाठी स्पर्धकांना ए-3 पेजेसवर त्यांची संकल्पना सादर करावी लागणार आहे. परीक्षणानंतरही त्यांच्या संकल्पनेला मंजुरी देण्यात येईल. 

40 किमी अंतराच्या भिंती रंगणार 

स्पर्धेसाठी सार्वजनिक, निमसार्वजनिक आणि काही खासगी संस्थांच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. 40 किमी अंतराच्या भिंतींवर चित्रे काढण्यात येईल. याशिवाय काही नागरिकांना त्यांच्या भिंतीवरही चित्रे काढण्याची संधी आहे. 

Web Title: wall art of grafiti