Winter Session : हिवाळी अधिवेशनावर विदर्भवाद्यांचा हल्लाबोल; अ‍ॅड. वामनराव चटप

१९ डिसेंबरला धडकणार; माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांची माहिती
Wamanrao Chatap
Wamanrao Chatapsakal

अमरावती : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १९ डिसेंबरला नागपूर येथे सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. मोर्चाच्या माध्यमातून सरकारला विदर्भातील नागरिकांचा रोष पाहायला मिळेल, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले. अ‍ॅड. चटप म्हणाले की, विदर्भाची मागणी जुनी असून सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. स्वतंत्र विदर्भाची मागणी लोकसभेत बुलंद न करणाऱ्या विदर्भातील १० खासदारांच्या कार्यालयांवर समितीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढून त्यांचे राजीनामेदेखील मागितले होते, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

१९ डिसेंबरला एक वाजता यशवंत स्टेडीयमवरून मोर्चाला सुरुवात होणार असून विधिमंडळावर धडकणार आहे. विदर्भ आंदोलनाशी जुळलेल्या अनेक लहान-मोठ्या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शेतीपंपांचे भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. चटप यांनी सांगितले. पत्रपरिषदेला रंजना मामर्डे, प्रभाकर कोंडबत्तुवार, राजेंद्र आगरकर, डॉ. विजय कुबडे, माधव गावंडे, सुनील साबळे, रामदास डवले, सतीश प्रेमलवार, दिनकर निस्ताने, दीपक कथे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com