संग्रामपूर : वाण धरण ६५ टक्के भरले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

संग्रामपूर : सातपुडा पर्वतामधील तीन जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरलेले वाण धरण 65 टक्के भरले आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या धरणातील साठ्यावर अवलंबून आहे.

निसर्गाचे  सान्निध्यात असलेले वाण धरण यंदा ऑगस्ट महिन्यात 65 टक्के भरले आहे. अजून पावसाळा बाकी असल्याने पाणी साठ्यात वाढ होण्याची आशा आहे. एक महिन्याच्या खंडानंतर  पावसाने दमदार हजेरी लावल्याने सातपुडा पर्वतामधील नदी नाल्याना पाणी वाहले.

वाण धरणातील पाण्याचा साठा वाढ होण्यासाठी मध्यप्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये पाऊस होणे गरजेचे असते . या धरणातील पाण्यावर खारपान पट्ट्यातील 140 गाव पाणीपुरवठा योजनेची मदार आहे. नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी वर्षभर पुरवठा होण्याच्या दृष्टीने सदर धरण 100 टक्के भरणे निकडीचे आहे.

या धरणाची पूर्ण संचय पातळी क्षमता 412 मिटर आहे. 18 आगस्ट रोजी जलाशय पातळी 405.08 मिटर एवढी असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Web Title: Wan dam storage at 65 percent