'वान’चे पाणी सोडले नदीपात्रात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

दानापूर : जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान प्रकल्पात पाण्याचा साठा वाढत असून दक्षता म्हणून अाज दोन दरवाजे उघडण्यात अाले. यातून प्रतिसेंकद १५.७५ दलघमी इतका विसर्ग होत अाहे. हे पाणी वान नदीतून वाहत असून संभाव्य काळजी घेत नदी काठांवरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात अाला अाहे.

मागील दोन वर्षांत या प्रकल्पातून प्रथमच पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ अाली अाहे. शुक्रवारी (ता.२४) अकोला-बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान प्रकल्पाचे एक व सहा क्रमांकाचे  दोन दरवाजे १० सेंटीमीटरने उघडण्यात अाले अाहेत. वारी हनुमान येथे वान नदीवर प्रकल्प उभारण्यात अाला अाहे. या प्रकल्पात सातपुडयातून पाण्याची अावक होते. या महिन्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने हा प्रकल्प ८५ टक्क्यांवर पोचला. पाण्याची सातत्याने अावक सुरु असल्याने प्रशासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात अाले अाहेत.

प्रतिसेकंद १५.७५ एवढा विसर्ग होत अाहे. हे पाणी वान नदीपात्रातून वाहू लागले अाहे. संभाव्य पूर परिस्थिती पाहता या नदी दानापूर, सोगोडा, वडगाव वान, काटेल, कोलद,रिंगणवाडी, वानखेड, पातुर्डा अादी नदी काठावरील दोन्ही कडील गावांमध्ये सर्तकतेचा ईशारा देण्यात अाला अाहे. 

Web Title: Wan leaves water in river