2021च्या जनगणनेत ओबीसींचा कॉलम हवा, अन्यथा सहभागी होणार नाही; ओबीसींचा इशारा 

Want separate column in 2021 Census OBC seeks to Government
Want separate column in 2021 Census OBC seeks to Government

चंद्रपूर : देशभरात जनावरांची मोजणी होते. मात्र मागील 90 वर्षात ओबींसीची जनगणना झाली नाही. त्यामुळे सन 2021 च्या जनगणेत ओबीसींचा कॉलम हवा. अन्यथा जनगणनेत सहभागी होणार नाही, असा इशारा हजारो संख्येत  एकत्र आलेल्या ओबीसींनी दिला. ओबीसी जनगणना समन्वय समितीच्यावतीने आज गुरवारला चंद्रपुरात ओबीसींचा विशाल मोर्चा काढण्यात आला. 

या मोर्चा जिल्ह्याभरातून हजारोंच्या संख्येत ओबीसी प्रवर्गातील पुरूष, महिला आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. या मोर्चात ओबीसी प्रवर्गातील सर्वच जाती समूहांचा समावेश होता. संविधान दिनी आयोजित या मोर्चाचा प्रारंभ दीक्षाभूमी येथून झाला. शहरातील मुख्य मार्गावरून गेलेल्या मोर्चाचा समारोप चांदा क्‍लब मैदानावर झाला.

ओबीसींची जात निहाय जनगणना झालीच पाहिजे, अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. कोविडच्या पार्श्‍वभूमी असतानाही मोठ्या संख्येत लोक एकत्रित आले. सर्वच राजकीय पक्षांचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचा समारोप चांदा क्‍लब मैदानासमोर झाला. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच पक्षांचे राजकीनेते मोर्चात सहभागी झाले होते. मात्र ते सामान्य ओबीसी कार्यकर्ता म्हणून मोर्चाला हजर होते. विशेष म्हणजे बहुजन कल्याण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे आणि आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या ताई गुरनुले मंचाच्या खाली मोर्चेकऱ्यांमध्ये बसले होते. त्यांना जनगणना समन्वय समितीच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी ओबीसी जनगणना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. या समितीचे संयोजक बळीराज धोटे यांनी समारोपी भाषण केले. आजवरच्या राजकर्त्यांनी ओबीसी समाजाचे प्रश्‍न सोडविले नाही. म्हणून ओबीसींमध्ये असंतोषाची ढिगणी पडली आहे. जो समाज रडतो. त्याचे अश्रू राजकर्ते पुसरतात. त्यामुळे ओबीसींनी आता रडले आणि लढले पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले. 2021 च्या जातनिहाय जनगणेत ओबीसींची मोजणी झाली नाही तर जनगणेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मोर्चेकऱ्यांनी जाहीर केले. 

दरम्यान मोर्चकऱ्यांसाठी विविध सामाजिक संघटनांनी शहरात मदतीचा हात दिला. यंग चांदा बिग्रेड, ओबीसी मुस्लिम संघटनांनी पाणी वाटप केले. मोर्चासाठी जवळपास एक हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होतो. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक मोर्चेकऱ्याला सॅनिटायझर देण्यात आले. शारिरीक दूर ठेवण्याचे आवाहन मोर्चेकऱ्यांकडून केले जाते होते. परंतु गर्दीमुळे ते शक्‍य झाले नाही. मोर्चा शांततेत पार पडला. पहिल्यांदा ओबीसी समाजातील विविध संघटन एकत्र येवून रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com