वर्ध्यात जप्तीच्या कारवाईने जिल्हा प्रशासनात खळबळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

वर्धा - आर्वी तालुक्‍यातील खापरी येथील प्रकल्पग्रस्त दोन शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्याने न्यायालयाच्या आदेशावरून मंगळवारी (ता. 5) जिल्हाधिकारी कार्यालय व विशेष भूसंपादन कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईने जिल्हा प्रशासनात खळबळ निर्माण झाली.

दहेगाव (गोंडी) येथील रमाबाई खोब्रागडे यांची सव्वातीन एकर आणि किशोर चहांदे यांची सव्वादोन एकर जमीन शासनाने तलावासाठी अधिग्रहीत केली; परंतु अल्प मोबदला दिल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाविरुद्ध जिल्हा न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी करून सहदिवाणी न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचा आदेश जारी केला; मात्र जिल्हा प्रशासनाने मोबदला दिला नाही. परिणामी न्यायालयाच्या आदेशावरून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची खुर्ची व विशेष भूसंपादन जिल्हाधिकारी शैलेंद्र पांडे यांच्या खुर्चीसह कार्यालयातील संगणक जप्तीची कारवाई दुपारी बेलिफाने केली.

Web Title: Wardha district administration to take action against the confiscation of excitement