वर्धेतील 'ड्रॉयपोर्ट'चे काम अजूनही कासवगतीनेच, संरक्षक भिंतीलाही तडे

wardha dry port work still not complete
wardha dry port work still not complete

सिंदी रेल्वे (जि. वर्धा): गेल्या तीन वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी सेवाग्राममध्ये डिजिटल पद्धतीने 'ड्रॉयपोर्ट' प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, तीन वर्ष उलटून प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही. अत्यंत कासवगतीने चाललेल्या कामाच्या भिंतींना देखील तडा गेला आहे.

शहरालगत दिन इंडिया या प्रकल्पासाठी १९८५ ला ६५० एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली होती. त्यापैकी ४०० एक जमिनीवर 'ड्रॉयपोर्ट'ची निर्मिती करण्याची घोषणा केंद्र सरकारच्या जेएनपीटी या संस्थेने केली होती. ड्रॉयपोर्टच्या रुपाने नवीन आशेचा किरण उगवल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते. त्यामुळे ३५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून औद्योगिकीकरणाच्या नावाने ओस पडलेली जमीन यामुळे कमी लागणार होती. तसेच चौथ्या पिढीला का होईना याचा लाभ मिळणार होता. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चालना दिली. 

सर्व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करत २ ऑक्टोबर २०१७ ला गांधी जयंतीनिमित्त या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याच जोमाने कामाला सुरुवात झाली. पहिल्यांदा जमीन अधिग्रहीत करून संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर आतील कामही सुरू झाले. रेल्वेलाइन उभारणीसाठी सिलपाट, गिट्टी, आधी सामुग्री येऊन पडली. सिमेंट प्लॅटफॉर्मचे काम सुरू झाले. पण, त्यानंतर काय झाले माहिती नाही. मोठ्या गाजावाजाने सुरू झालेल्या कामाची गती मंदावली. लॉकडाऊन काळात तीन महिने काम बंद होते. त्यानंतर अगदी कासवगतीने हे काम सुरू आहे.

दर्शनिय भागात लावलेल्या प्रकल्पाच्या फलकावर एजन्सीचे नाव एस. सी. गुप्ता असे लिहिले असून प्रकल्प पूर्णत्वाची तारिख ३/६/२०१९ अशी नोंद आहे. मात्र, आता २०२० संपत आले आणि प्रकल्प अजूनही पूर्ण झाला नाही. प्रकल्पाच्या कामाचा वेग पाहता हा प्रकल्प पूर्ण होणार की 'दिन इंडिया' प्रकल्पासारखा लुप्त होणार?  असा सवाल उपस्थित केला जात आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com