Wardha : समुद्रपूर रुग्णालयाला आग

शॉर्टसर्किटमुळे घडली घटना सतर्कतेने जीवितहानी टळली
Wardha
Wardha Sakal

वर्धा: समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना बुधवारी (ता.१२) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. नागरिकांच्या सतर्कतेने आगीवर लगेच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

समुद्रपूर शहरात जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. रात्री १० वाजताच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने केबलने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले.रुग्णालयात आग लागल्याचे समजताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी रुग्णालयात धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

दरम्यान काही वेळासाठी समुद्रपूर गावातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. आग लागली त्यावेळी रुग्णालयात २० ते २५ रुग्ण भरती असल्याची माहिती आहे.पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. या आगीत विशेष नुकसान झाले नसले तरी नागरिकांच्या सतर्कतेमुळे होणारा अनर्थ टळला.दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचारी आणि नागरिकांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी अग्निशमन सिलिंडरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com