ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

महिलेसोबातच सावंगी रुग्णालयात उपचारासाठी आलेला रुग्णही पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याचा अहवाल पोझेटिव्ह आल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा रुग्ण वाशीम जिल्ह्यातील असल्याने त्याची नोंद जिल्ह्यात होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

वर्धा : आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश झाला आहे. आर्वी तालुक्‍यातील एका महिलेचा अहवाल पोझेटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. महिलेचा अहवाल रविवारी प्राप्त झाल्याने या बाबीचा खुलासा झाला. यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ माजली आहे. 

आर्वी तालुक्‍यातील हिवरा तांडा या गावातील महिलेला त्रास असल्याने सावंगी येथील रुग्णालयात तापसणीसाठी पाठविण्यात आले होते. यावेळी तिच्या गळ्याचा स्त्राव तापसनीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेला वर्धा जिल्हा कोरोना प्रादुर्भाव असलेला झाला आहे. 

हेही वाचा - नवरदेव आला अन् नवरीला दुचाकीवर घेऊन गेला...वाचा...कसे लागले लग्न?

या महिलेसोबातच सावंगी रुग्णालयात उपचारासाठी आलेला रुग्णही पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याचा अहवाल पोझेटिव्ह आल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा रुग्ण वाशीम जिल्ह्यातील असल्याने त्याची नोंद जिल्ह्यात होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

हिवरा तांडा गाव केले सील

रुग्ण आढळून आलेल्या हिवरा तांडा या गावाला सील करण्यात आले आहे. सोबातच येथील शासकीय रुग्णालयालाही सील करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

अंत्ययात्रेत अनेक नागरिक झाले होते सहभागी

या महिलेच्या अंत्ययात्रेत गावातील अनेक नागरिक सहभागी झाले होते. यामुळे महिलेच्या अत्यंत जवळचे आणि अंत्ययात्रेत गेलेल्या सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

क्लिक करा - आग्रहाखातर तो सासरी राहायला गेला; मात्र, पत्नीचे दुसऱ्याशी सूत जुळल्याने घडला थरार...

स्रोताची माहिती नाही

महिलेला कोरोनाची लागण कुठून झाली याची माहिती प्रशासनाला मिळाली नाही. त्याचा तपास सुरू आल्याचे सांगण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wardha found first corona positive patient