वर्धेत सापडले मुगलकालीन नाण्यासह सोन्याचे बिस्कीट; किंमत २० लाख ५४ हजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्धेत सापडले मुगलकालीन नाण्यासह सोन्याचे बिस्कीट; किंमत २० लाख ५४ हजार

वर्धेत सापडले मुगलकालीन नाण्यासह सोन्याचे बिस्कीट; किंमत २० लाख ५४ हजार

पुलगाव (जि. वर्धा) : लगतच्या नाचणगाव येथील शेतात एका लोखंडी डबीत मुगलकालीन नाण्यासह (Mughal coins) सोन्याचे बिस्कीट आणि सोन्याच्या इतर वस्तू(Gold goods) सापडल्या आहेत. या वस्तू येथे कशा आल्या या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे. या सोन्याची किंमत २० लाख ५४ हजार ४०० रुपये आहे. या सोन्याबाबत माहिती मिळविण्यासाठी सोने पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Wardha found gold biscuits with Mughal water)

पोलिस सूत्रानुसार, नाचणगाव येथील सतीश उल्हास चांदोरे यांच्या शेतात लोखंडी डबीत सोने सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता शेतात पडीक घराची माती टाकली. त्या मातीमधील गोटे आणि कचरा वेचताना मजुरांना ही डब्बी सापडली. त्या डबीत पाहिले असता एक सोन्याचे बिस्कीट ज्यावर नॅशनल बॅक ऑफ इंडिया असे लिहिले होते.

हेही वाचा: VIDEO : चंद्रावर दफन केलेली एकमेव व्यक्ती माहिती आहे का?

तसेच एक मोगलकालीन नाणे, एक सोन्याचा तुकडा, दोन गोल सोन्याचे वेळे, कानातील चार सोन्याच्या रिंग आदी वस्तू मिळून आल्या. या सोन्याचे वजन ४२८ ग्रॅम असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रवींद्र गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक दहिलेकर, खुशालपंत राठोड, बाबूलाल पंधरे, महादेव सानप, जयदीप जाधव, मुकेश वांदिले, सचिन बागडी यांनी केली.

(Wardha found gold biscuits with Mughal water)

Web Title: Wardha Found Gold Biscuits With Mughal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Wardha
go to top