Vardha News: कागदावर दारूबंदी, गल्लीबोळात बाटली; गांधी जिल्ह्यात अवैध मद्याचा महापूर : बनावट दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर

Fake Alcohol Poses Serious Threat to Citizens: गल्लीबोळापर्यंत पसरलेल्या या अवैध रॅकेटमुळे गुन्हेगारी वाढली आहे आणि नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
Vardha News

Vardha News

esakala

Updated on

वर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वर्धा जिल्ह्यात १९७४ पासून अधिकृतरीत्या दारूबंदी लागू करण्यात आली. जिल्ह्याला लाभलेला अहिंसेचा वारसा जपण्यासाठी घेतलेला हा निर्णय आता केवळ कागदावरच उरल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील शहरापासून ते ग्रामीण भागातील गल्लीबाेळापर्यंत अवैध दारूविक्रीने जोर धरला असून, यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे दारूबंदीचा पुरता फज्जा उडाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com