वाघिणीच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; वाघीण पकडण्यात अपयश

भूपेश बारंगे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

ही वाघीण पकडण्यासाठी वनविभागाने लाखो रुपये खर्च केले. मात्र वाघीण पकडण्यात वनविभागाला यश आले नाही.

वर्धा : आष्टी तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी शेतातून बैल घरी परत आणत असताना एका वाघिणीने हल्ला चढवला. या हल्ल्यात बैल पळून गेले. वाघिणीने शेतकरी भिवजी गोंडुजी हरले यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात शेतकरी जागीच ठार झाला.

या वाघिणीला ब्रह्मपूर जंगलात असाच उपद्रव केल्याने तिला वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यत आणण्यात आले. येथून देखील या वाघिणीने पळ काढला. त्यानंतर या वाघिणीने कारंजा वनपरिक्षेत्र गायी ठार केल्या. यात तेथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यानंतर ही वाघीण लिंगा मांडवी परिसरात शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यात ते बचावले. त्यानंतर ही वाघीण तळेगाव (श्याप) या वनविभाग परिक्षेत्रात गेली. त्यानंतर ती पुढे गेली आणि आष्टी वनविभाग वनपरिक्षेत्र त्या वाघिणीने शेतकऱ्याचा जीव घेतला. ही वाघीण पकडण्यासाठी वनविभागाने लाखो रुपये खर्च केले. मात्र वाघीण पकडण्यात वनविभागाला यश आले नाही.

शासनाचा पैशाचा चुराडा वनविभागाकडून करण्यात आला. त्यामुळे आज शेतकऱ्यांना जीव गमावून आठ लाखांची मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. वाघिणीला पकडण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. पण ती जर पकडली गेली असती तर या शेतकऱ्याचा जीव गेला नसता, अशी हळहळ येथील नागरिक व्यक्त करत आहेत. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: wardha marathi news bor tiger reserve tigress kills farmer

टॅग्स