आर्वी पोलिसांकडून गुन्हेगारांसह दुचाकी व देशीकट्टा जप्त

राजेश सोळंकी
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

आर्वी (वर्धा): शिरपूर रोड वरील रामदेवबाबा लॉन समोर विरळ लोकवस्ती जवळील कॉलनी मध्ये चार ते पाच अनोळखी व्यक्ती हाताथ पेजकस, तलवार, लोंखडी रॉड घेउन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी परीसरात तिघे आढळून आले. त्यांच्याकडून दुचाकी व देशीकट्टा जप्त करण्यात आला आहे.

प्रज्वल राजपाल मेश्राम (नागपुर), रवी उर्फ माकड्या बोरकर (नागपूर) व राजेश उर्फ देनगन महल्ले (नागपूर) या  तिघांना अटक करण्यात आली आहे. हे दरोडेखोर परीसरात घरावर दरोडा टाकण्याचे किंवा मार्गाने येणार्या-जाणार्या व्यक्तीला लुटण्याचे उद्देशाने दबा धरुण बसले असल्याचे पोलिसांचे निर्दशनात आले.

आरोपींना न्यायालयात दाखल केले न्यायालयाने त्यांना १४ दिवसाची पोलिस कोठळी सुनावली. या वेळी पोलिसांनी रवि उर्फ माकड्या बोरकर याचा पिसीआर घेतला असता त्यांने हिंगणावरुन दुचाकी पल्सर चोरुल्याची कबुली दिली हि दुचाकी चांदुर रेल्वे वरुन जप्त केली तर यातील फरार आरोपी विशाल मानेकर जरपटका याच्या घरुन गुन्हात वापसलेला एक देशी कट्टा व दुचाकी जप्त केली.

सदर कार्यावाही पोलिस अधिक्षक निर्मलादेवी एस व आर्वी येथील उपविभागीय अधिकारी प्रदिप मौराळे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अशोक चौधरी यांचे सह पोलिस कर्मच्यार्यांनी केली.

Web Title: wardha news aarvi police three arrested