वर्धा: नवजात अर्भकाच्या हत्येचा संशय

भुपेश बारंगे
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

या गावात कुमारी मातेने अनैतिक संबंधामधून दोन दिवसांपूर्वी या मुलाला जन्म दिला असल्याचे सांगतिले जात असून रात्री त्याला फेकले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या नवजात मुलाच्या गळ्याला पालवाने जबरदस्तीने गुंडाळले असल्याचे दिसत असल्याने त्याची हत्या करून फेकल्याचा संशय निर्माण झाला आहे.

कारंजा (घा) : तालुक्यातील बोंदरठाणा येथे आज (सोमवार) पहाटे गावालगत नथ्थू शेंदरे यांच्या शेतातील गोबरगॅस टाकीत नवजात अर्भकाचा मृतदेह सापडला. या अर्भकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या गावात कुमारी मातेने अनैतिक संबंधामधून दोन दिवसांपूर्वी या मुलाला जन्म दिला असल्याचे सांगतिले जात असून रात्री त्याला फेकले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या नवजात मुलाच्या गळ्याला पालवाने जबरदस्तीने गुंडाळले असल्याचे दिसत असल्याने त्याची हत्या करून फेकल्याचा संशय निर्माण झाला आहे. ही हत्या आहे की नाही यासाठी कारंजा पोलिसांनी ते अर्भक शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. त्यानंतर याबाबतचे सत्य समोर येणार आहे.

मात्र गावात हे वृत्त पासरातरच गावातील ती कुमारी माता कोण? हा चर्चेचा विषय बनला आहे. सध्या कोणीही याबाबत माहिती दिली नसून या प्रकरणात किती जणांचा संबंध आहे याची पोलिस चौकशी करत आहेत.

Web Title: Wardha news foeticide found dead in wardha

टॅग्स