सडका कापूस रस्त्यावर; पालिकेने आकारला ५० हजराचा दंड

राजेश सोळंकी
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

आर्वी (वर्धा): येथील टि पॉइंट वर्धा मार्गावरील जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीतिल सडका कुजलेला काळा कापूस भर रस्त्यावर शासकीय जागेवर यंत्राचे सह्याने टाकल्याने नागरिकात मोठ्याप्रमाणावर रोशाचे वातावरण निर्माण  झाले. हि माहिती मिळताच नगर पालिकेचे अध्यक्ष मुख्याधिकारी आरोग्य अधिकारी अभियंता आणि पदाधिकारी यांचे सह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाचारण करुन कचरा टाकणारे फॅक्टरीचे यंत्र जप्त करण्यात आले आणि याबाबत ५० हजराचा दंड नगरपालिकाने आकारल्याची घटना आज (मंगळवार) दुपारी साडेअकराच्या दरम्यान घडली.

येथील टि पॉइंट वर्धा मार्गवर अग्रवाल बंधूंचा जिन आहे. या जिनातिल सडका, खराब काळा कापूस नेहमीच काम करणारे मजूर भर रस्त्यावर टाकून देतात. आर्वी-वर्धा मार्ग असल्याने मोठ्या वाह्तूकीने हा कापूस उडून दुरवर उडतो. मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूला कचरा होतो. समोरच असलेल्या कृशक स्कूलच्या विद्यार्थ्यांनाही कापूस व धूळ याचा अतोनात त्रास होतो.

अनेकदा हा कापूस रस्तावर पेटवून देतात. महत्त्वाचे म्हणजे या जिन समोरच लाठीवाला यांचा पेट्रोल पंप आहे. थोड्याच अंतरावर खान यांचा हि पेट्रोलपंप आहे. कापसाची एखादी चिंगारी हवेत उडून मोठ्या प्रमाणात आग लागून नुकसान होण्याची शक्यता टाळता येत नाही, असे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यानी सांगितले.

आर्वी शहरात मोठ्याप्रमाणावर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालय अनेक सामाजिक संस्था, समिती संघटना, नागरिक, नगरसेवक पदाधिकारी शहर स्वच्छतेसाठी एकटवले आहेत. मागील १ ते दीड महिन्यापासून रात्रं-दिवस एक करुन स्वच्छतेचे धडे गिरवल्या जात आहेत. मात्र, या जिनिंग प्रेसिंगचा सडका काळा कापूस जाणीवपूर्वक रस्त्यावरील शासकीय जागेवर टाकला जातो. त्याचा भर रस्त्यावर कचरा होऊन आरोग्य खराब होते. अनेकांनी या संदर्भात रोश व्यक्त केला. या नंतर असा प्रकार घडल्यास जिनचा विदुत पुरवठा खंडित करुन अन्य दंड वसूल केल्या जाईल, असा इशारा मुख्यधिकारी गणेश शिंदे यांनी दिला. पोलिसामार्फतही कारवाई केली जाईल, अशी तंबी फौजदार श्री. ढोले यांनी दिली.

Web Title: wardha news waste cotton road crime aarvi municiapal fine