आषाढीला पूजेचा मान अन् कार्तिकीला सोडले पंढरपुरात प्राण

warkari
warkari

देऊळगावराजा : गेल्या साडेतीन दशकापासून पांडुरंगाची निस्सीम भक्ती करणारे व याच भक्तीचे फलित म्हणून 2011 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत शासकीय पूजेचा मान प्राप्त तालुक्यातील रोहणा येथील गणेशराव डोके यांचे कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूर येथे विठ्ठल दर्शन घेण्याअगोदर हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी (ता.19) पंढरपुरात निधन झाले. त्यांच्या या निधनाने गावकर्‍यांसह वारकरी संप्रदायावर दुःख कोसळले आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगा चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी संप्रदायात आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीचे महत्त्व असून या मुहूर्तावर पांडुरंग भक्त विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. देऊळगावराजा तालुक्यातील रोहणा येथील गणेशराव सखाराम डोके व त्यांच्या पत्नी रुख्मीनाबाई डोके हे सुद्धा विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेल्या अनेक वर्षा पासून न चुकता पंढरपूरची वारी करत असताना 2011 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्यासोबत महापूजा करण्याचा लाभ या डोके कुटुंबाला मिळाला होता. तेव्हापासून गणेशराव डोके हे कार्तिकी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे जात असे नित्यनेमाप्रमाणे यंदाही गणेशराव डोके व त्यांचे गावातील सहकारी ज्ञानदेव माऊली डोके हे पंढरपूर येथे दाखल झाले. त्यांनी पुणे पाषाणकर मठ येथे विश्राम केला. कार्तिकी एकादशीचे दर्शन घेण्यासाठी पहाटे 3 वाजता स्नान करण्यासाठी निघाले असता त्यांच्या छातीत दुखण्यास लागल्याने त्यांना त्यांचे सहकारी ज्ञानदेव डोके यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या पूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली व कार्तिकी एकादशीचे दर्शन घेण्या अगोदरच त्यांनी प्राण सोडले.

तालुक्याला मिळालेला एकमेव बहुमान
तालुक्यातील रोहणा येथील गणेशराव डोके गत तीस वर्षापासून आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असे. 2011 मध्ये त्यांना पायी वारीतील भाग्यवान दांपत्य म्हणून विठोबाच्या महापूजेचा मान मिळाला. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत विठ्ठल रुक्माईची पूजा केली. हा सन्मान तालुक्यात आतापर्यंतच्या इतिहासात पहिला सन्मान होता व आजही हा सौभाग्याचा सन्मान फक्त गणेशराव ढोके यांच्याच नावावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com