वृद्ध शेतकऱ्याचा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

संग्रामपूर : शासनाच्या हमीभाव योजनेत मुलाने विकलेल्या तुरीचे पैसे व्याजासकट देण्यात यावे. यासाठी वयोवृद्ध वडिलांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा थेट मुख्यमंत्र्यांनाच दिला आहे. 

संग्रामपूर : शासनाच्या हमीभाव योजनेत मुलाने विकलेल्या तुरीचे पैसे व्याजासकट देण्यात यावे. यासाठी वयोवृद्ध वडिलांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा थेट मुख्यमंत्र्यांनाच दिला आहे. 

संग्रामपूर( बुलढाणा) तालुक्यातील काकोडा येथील वासुदेवराव मानखैर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या मध्ये माझा मुलगा अरविंद वासुदेवराव मानखैर ह्याने संग्रामपूर येथे 8 महिन्यांपूर्वी शासनाचे हमी भाव योजनेत 18 क्विटल 50 किलो तूर विक्री केली. माझे वय 85 वर्ष असून आता पर्यत तीन ऑपरेशन झाले आहेत. अजून चवथे मोठे ऑपरेशन करण्यासाठी खर्च खूप आहे. तुरीचे पैसे मिळावे यासाठी 5 नोव्हेंबरला ए आर आणि तहसीलदार यांना लेखी पत्र दिलेले आहे. त्याची दखल न घेता उलट अपमानास्पद वागणूक देण्यात आली. यामुळे उपचार कसे करायचे हाच प्रश्न आहे. तातडीने माझ्या मुलाचे तुरीचे पैसे मिळाले नाहीत. तर लोकशाही मार्गाने अन्नत्याग करून उपोषण करेल. यात माझे जिवा चे काही कमी जास्त झाल्यास याला शासन जबाबदार राहील. अश्या आशयाचे लेखी पत्र वासुदेवराव मानखैर यानी मुख्यमंत्री यांच्यासह सहकार मंत्र्यांकडेही पाठविले आहे.

गत वर्षात तुरीची विक्री केलेल्या व पैसे बाकी असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पेमेंटचे वाटपा बाबत आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिवाळी पूर्वीच मुख्यमंत्री यांचे सोबत चर्चा केली होती. त्यावर प्रधान सचिव आणि संबधीत विभागाचे अधिकारी यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या होत्या. ज्या केंद्रावर तूर विक्री करण्यात आली. त्या ठिकाणाहुन पेमेंट टाकण्याची पूर्वीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली असताना मुंबईच्या कार्यालयातुन पैसे टाकण्यात विलंब का होत आहे. हाच प्रश्न सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे. कारण दररोज तूर उत्पादक संस्थेमध्ये येऊन पेमेंट बाबतीत विचारणा करीत आहेत. त्यांना उत्तर देण्यात कर्मचारी त्रस्त होत आहे. शासनाकडून पेमेंट वाटपाची अडचण नसताना संबंधित विभागाचे अधिकारी ह्या विषयी गभीर नसल्याने शासना प्रति शेतकऱ्यांमध्ये प्रक्षोभ उसळत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Warning of old farmer for agitation against government