esakal | Video : साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असता तर, आमच्यावर ही वेळ आली नसती; चक्क पोलिस कर्मचाऱ्याने देवेंद्र फडणवीस यांच्या समोर...

बोलून बातमी शोधा

devendra fadnavis.jpg}

रविवारी (ता.17) दुपारी दीडच्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूरवरून मुंबईला जात होते. यावेळी खंडेराव मुंढे यांच्या आग्रहामुळे ते पाच मिनिटांसाठी किन्हीराजा येथील शिवाजी हायस्कूल येथे थांबले व मालेगाव तालुक्यातील शेतकर्‍यांची आपुलकीने विचारपूस केली.

Video : साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असता तर, आमच्यावर ही वेळ आली नसती; चक्क पोलिस कर्मचाऱ्याने देवेंद्र फडणवीस यांच्या समोर...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किन्हीराजा (जि.वाशीम) : ‘साहेब, आमच्याकडे कीट नाही, मास्क नाही, सॅनिटायझर नाही, कामाचा प्रचंड तणाव आहे. तुम्ही, मुख्यमंत्री असता तर आमच्यावर आज ही वेळ आली नसती.’ अशी व्यथा जऊळका पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या किन्हीराजा येथील महामार्गावर पेट्रोलिंग करणार्‍या पोलिस कर्मचार्‍याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (ता.17) दुपारी दीडच्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूरवरून मुंबईला जात होते. यावेळी खंडेराव मुंढे यांच्या आग्रहामुळे ते पाच मिनिटांसाठी किन्हीराजा येथील शिवाजी हायस्कूल येथे थांबले व मालेगाव तालुक्यातील शेतकर्‍यांची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी आपण सर्वांनी कोरोनापासून स्वतःची काळजी घ्यावी, असे ही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आवश्यक वाचा - अबब! सोन्यापेक्षाही महाग असलेल्या कस्तुरीच्या मातीची हवेली, तीही महाराष्ट्रातील या जिल्ह्यात, सुगंधासाठी पर्यटकही...

यावेळी सुरेश मुंढे व विनोद घुगे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, कर्तव्यावरील पोलिस कर्मचार्‍यांची देवेंद्र फडणवीस यांनी आपुलकीने विचारपूस केली. यावेळी संबंधित पोलिस कर्मचार्‍याने आपली व्यथा मांडली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘तुम्ही ड्युटी करत असताना कोरोनासारख्या संसर्ग रोगापासून आपला बचाव करा. स्वतःची काळजी घ्या. कारण, तुम्ही अहोरात्र सेवा देत आहात’ असे सांगितले.

महत्त्वाची बातमी - अरे हे काय! या मोठ्या योजनेला केवळ एक हजार रुपयाची तरतूद; हे कसले नियोजन

पोलिस खाते बाजूला ठेवून राजकारण करावे
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून पोलिस कर्मचार्‍यांना मास्क, सॅनिटायझर, शिल्ड मास्क या सर्व बाबी पुरविलेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टीचे कृपया राजकारण करू नये. तसेच काही कमी असेल तर त्यांच्या मागणीनुसार पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून त्या गोष्टी मिळतात. तरी पोलिस खाते बाजूला ठेवून राजकारण करावे ही विनंती.
-बाळू जाधवर, ठाणेदार जऊळका पोलिस ठाणे