Washim : तरुणीला पोलिसांनी घरी सोडलेलं, २ दिवसांनी नग्नावस्थेत आढळला मृतदेह; वाशिम हादरलं
Washim Crime News : २२ वर्षीय मतिमंद मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आलाय. तिची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे. तिच्या डोक्यावर मारहाणीच्या खुणा आहेत.
Washim police under scrutiny after girl found dead two days post drop-offEsakal
एका मतिमंद मुलीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आल्यानं वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कारंज तालुक्यातील काजळेश्वर इथं एका पुलाखाली मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.