मुख्यमंत्र्यांना आता शिकवणीची गरज: सुप्रिया सुळे

राम चौधरी
बुधवार, 21 जून 2017

वाशीम: राज्याचे मुख्यमंत्री शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर गेल्या तीन वर्षापासून अभ्यास करीत आहेत. मात्र, त्यांचा अभ्यास अजूनही पूर्ण होत नाही. याचा अर्थ एकाच वर्गात बसणार्‍या मुख्यमंत्र्यांना आता शिकवणी लावण्याची गरज आहे, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

वाशीम: राज्याचे मुख्यमंत्री शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर गेल्या तीन वर्षापासून अभ्यास करीत आहेत. मात्र, त्यांचा अभ्यास अजूनही पूर्ण होत नाही. याचा अर्थ एकाच वर्गात बसणार्‍या मुख्यमंत्र्यांना आता शिकवणी लावण्याची गरज आहे, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आंदोलने या पार्श्‍वभूमिवर तसेच पक्ष पातळीवर संघटन बांधणीसाठी खासदार सुप्रिया सुळे या वाशीममध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र ही घोषणा फसवी असल्याचे दिसून येते. निकषावर आधारित कर्जमाफी देऊन शेतकर्‍यांसमोर या सरकारने अडचणीचा डोंगर उभा केला आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कायम शेतकर्‍यांच्या पाठीशी राहिली आहे. आणि भविष्यात रस्त्यावर उतरून शेतकर्‍यांना न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने केली जाणार आहे. नुसता अभ्यास करून भागत नाही, तर परीक्षाही द्यावी लागते. व जनतेत उत्तीर्णही व्हावे लागते, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, बाबाराव खडसे, माधवराव अंभोरे, पांडूरंग ठाकरे यांची उपस्थिती होती.

भ्रष्टाचार केला असेल तर सिद्ध करा
युपीए सरकारने देशातील शेतकर्‍यांच्या भल्यासाठी व्यापक कर्जमाफी केली होती. त्या कर्जमाफीत भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केल्याचे एैकीवात आहे. मात्र तुम्ही सत्तेत आहात तर याची चौकशी करा व तो सिद्ध करा, विरोधी पक्षात असताना हा मुद्दा का सुचला नाही. असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावत मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा मोठी असते. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. असा चिमटा त्यांनी काढला.

Web Title: washim news supriya sule political attack on cm devendra fadnavis