वाशिमध्ये खळबळ! २ किलो अंमली पदार्थ अन् लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Washim Police Seize 2 Kg Drugs & Fake Currency : वाशिम पोलिसांच्या या कारवाईनंतर रिसोडमधील गुन्हेगारीच्या मुळांना जोरदार हादरा बसला असून, अंदाजे १८ ते २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर दोन मुख्य आरोपींना जागीच अटक करण्यात आली आहे
Washim Police Seize 2 Kg Drugs & Fake Currency

Washim Police Seize 2 Kg Drugs & Fake Currency

esakal

Updated on

वाशिम/ रिसोड : शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिसोडमध्ये एका भयंकर घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. २ नोव्हेंबर रोजी, रिसोड शहरातील अमरदास नगर परिसरात पोलिसांनी एका अतिशय धाडसी कारवाईत अमली पदार्थ , गांजा आणि लाखो रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने गोपनीयतेने मिळालेल्या माहितीच्या आधारे ही धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईमुळे रिसोडमधील गुन्हेगारीच्या मुळांना जोरदार हादरा बसला असून, अंदाजे १८ ते २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर दोन मुख्य आरोपींना जागीच अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com