esakal | वाशिम जिल्हा परिषदेत 'काटे की टक्कर'; महाविकास आघाडी सत्ता राखणार? I Washim
sakal

बोलून बातमी शोधा

Washim Zilla Parishad

सध्या वाशिममध्ये अटीतटीची लढत पहायला मिळत असून दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागलीय.

वाशिम जिल्हा परिषदेत 'काटे की टक्कर'; महाविकास आघाडी सत्ता राखणार?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

वाशिम : सध्या वाशिममध्ये अटीतटीची लढत पहायला मिळत असून दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागलीय. वाशिम जिल्हा परिषदेच्या (Washim Zilla Parishad) 14 जागांसाठी एकूण 82 उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची जरी सत्ता असली, तरी या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविलीय.

हेही वाचा: भाजपला 'जोर का झटका'; मुंडण करत आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी

या निवणुकीत काँग्रेसनं 14 पैकी 9 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 11, आणि शिवसेनेने 12 आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले. या पोटनिवडणुकीमध्ये वंचित आणि जनविकास आघाडीची युती झालीय. वंचितनं 12 तर जनविकास आघाडीनं 2 जागांवर आपले उमेदवार उभे केले. तर भाजपाचे 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सध्या निवडणुकीत काँग्रेसनं 2, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1, जनविकास 1, अपक्ष 1 व वंचित आघाडीने 1 जागा जिंकलीय. पुढील निकाल येणास आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे.

loading image
go to top