Video : रुग्णालयातील कोरोनाग्रस्ताचे कपडे कोण धुणार? निर्माण झाली ही अडचण

प्रसाद नायगावकर
Wednesday, 18 March 2020

स्वच्छतेच्या दृष्टीने यांना नियमितपणे स्वच्छ कपडे व चादरी पुरविण्यात येतात. पण वापरलेले कपडे कोणी धुवायच्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सफाई कामगाराने हे कपडे शासकीय रुग्णालयाच्या लॉंड्रीमध्ये आणून टाकले. मात्र, कोरणाच्या भीतीने या लॉन्ड्रीतील धोब्यांनी हे कपडे धुण्यास नकार दिला आहे. आता या कपड्यांचे काय करावे असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

यवतमाळ : शासकीय रुग्णालयात कोरोना विषाणूनी ग्रासलेले तीन रुग्ण आहेत. त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. अशातच स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांचे कपडे, चादर वेळोवेळी बदलल्या जातात. पण आता हे कपडे कोणी धुवायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यवतमाळ शासकीय रुग्णालयातील धोब्यांनी हे कपडे धुण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

यवतमाळमध्ये शासकीय यंत्रणा कोरोनाशी लढायला सज्ज झाली आहे. यवतमाळमध्ये दुबईहून परत आलेल्या पर्यटकांपैकी तिघे कोरोनाबाधित सापडले आहेत. या रुग्नांना यवतमाळ शासकीय रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले आहे. या तिघांवरही योग्य पद्धतीने उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा पण होत आहेत.

ऐनवेळी रद्द झाला लॉन, मग काय नवरदेवाच्या कुटुंबीयांनी लढवली ही शक्कल... 

स्वच्छतेच्या दृष्टीने यांना नियमितपणे स्वच्छ कपडे व चादरी पुरविण्यात येतात. पण वापरलेले कपडे कोणी धुवायच्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सफाई कामगाराने हे कपडे शासकीय रुग्णालयाच्या लॉंड्रीमध्ये आणून टाकले. मात्र, कोरणाच्या भीतीने या लॉन्ड्रीतील धोब्यांनी हे कपडे धुण्यास नकार दिला आहे. आता या कपड्यांचे काय करावे असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washing issue of corona patients used clothes