बेसा येथील बहुमजली इमारतीतील सांडपाणी रस्त्यावर

नागपूर : पिपळा रोडवर साचलेले सांडपाणी.
नागपूर : पिपळा रोडवर साचलेले सांडपाणी.

नागपूर : बहुमजली इमारतीचे नंदनवन झालेल्या बेसा येथील रस्त्यांना सांडपाण्याचे ग्रहण लागले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. रस्त्यांवरच सांडपाणी सोडले जात असताना ग्रामपंचायत मात्र हातावर हात ठेवून बसली आहे. तक्रारीवर सिवेज लाइन आदी उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांत संताप वाढला आहे.
गेल्या काही वर्षात बेस्याला शहराच्या उपनगराचे स्वरूप प्राप्त झाले. गगनचुंबी इमारतींसह अनेक बंगले आदी तयार होत आहेत. वाढलेल्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायतची जबाबदारी वाढली. परंतु, ग्रामपंचायत जबाबदारी पार पडण्यात असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. बेसा-पिपळा मार्गावरील अक्षय निवास, श्री अपार्टमेंट, दत्त एन्क्‍लेव्ह आदी अपार्टमेंटमधील सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे. रस्त्यांवरील सांडपाण्याचा त्रास वाहनधारक, परिसरातील नागरिकांना होत आहे. सांडपाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या त्रासाची तीव्रता अधिक वाढली आहे. पावसाचे पाणी आणि सांडपाणी दोन्हींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मोकळी जागा असल्याने अनेकांनी या परिसरात घरे बांधली, फ्लॅट खरेदी केले. परंतु, ग्रामपंचायतीच्या दिरंगाईने येथील नागरिकांच्या स्वप्नांना सुरुंग लावल्याचे चित्र आहे. येथे सांडपाणी जमा होत असल्याच्या तक्रारी अनेकदा परिसरातील नागरिकांनी केल्या. परंतु, ग्रामपंचायतीने तक्रारींना केराची टोपली दाखविली. त्यामुळे नागरिकांत संतापाची लाट आहे. याशिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा परिषद आरोग्य विभाग कार्यालयाला तक्रार करण्यात आली. परंतु ना ग्रामपंचायत, ना प्रशासन, कुणीही लक्ष देत नसल्याने दाद कुणाकडे मागावी? असा प्रश्‍न या परिसरातील नागरिकांना पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com