वॉटर कप स्पर्धेद्वारे दुष्काळासोबत रणकंदन

पंजाबराव ठाकरे
बुधवार, 11 एप्रिल 2018

खारपान पट्टा अभिशाप असल्याने पावसाळ्यातील पाणी अडवून जिरवणे हा ऐकमेव पर्याय उरला आहे. त्यासाठी शेततळे, तलाव, बंधारे, शोषखड्डे आदी सारखी पान्याचा थेंब अन थेंब जिरवण्याचा उद्देश ठेऊन या तालुक्यात पाणी फाऊंडेशनचे वतीने जलजागृती श्रमदान आदी कामावर भर दिला जात आहे.

संग्रामपूर (बुलढाणा) - खारपान पट्ट्यातील संग्रामपुर तालुका पाणीदार करण्यासाठी 52 गावात दुष्काळासोबत रणकंदन सुरू झाले आहे. पाणी फाऊंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत एका दिवसात 20 गावात 150 नागरिकांनी 650 घनमीटर काम श्रम दानातून केले आहे. या तालुक्यात पाणी टंचाई भीषण समस्या बनली आहे. खारपान पट्टा अभिशाप असल्याने पावसाळ्यातील पाणी अडवून जिरवणे हा ऐकमेव पर्याय उरला आहे. त्यासाठी शेततळे, तलाव, बंधारे, शोषखड्डे आदी सारखी पान्याचा थेंब अन थेंब जिरवण्याचा उद्देश ठेऊन या तालुक्यात पाणी फाऊंडेशनचे वतीने जलजागृती श्रमदान आदी कामावर भर दिला जात आहे. यासाठी असलेल्या वॉटर कप स्पर्धेत 52 गावाचा सहभाग असून त्यापैकी 20 गावात युद्ध पातळीवर नागरिकांचा सहभाग वाढताना दिसत आहे.

45 दिवसांच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त श्रमदान करून जल स्रोत वाढविण्याचे काम करणारे गावाचे मूल्य मापन करून बक्षीससाठी अशा गावाची निवड केली जाईल. सद्यः स्तिथीत रात्री 12 वाजता श्रमदान करणारे काकोडा गावामध्ये 25 जण, जस्तगाव मध्ये 450, शेतखेडा मध्ये 120 आणि सकाळी  काम करणारे गावा मध्ये हिंगणा 55, सालवन 20, पातूरडा खु.40, दुर्गादैत्य 17, निवाना 75, चागेफळ खु.110, रुधाना 70, सावळी 20, वडगाव वाण 200 कोलद 80, एकलारा बा. 200, निमखेड 50, वकाना 25, वसाडी 6, तामगाव 150 असे 20 गावामधून1500 लोकांनी एकाच दिवसाचे श्रमदानातून 650 घनमीटर कामे केली आहेत. काळाची गरज ओळखून सुरू झालेली ही चळवळ गतिमान करण्यासाठी पाणी फाऊंडेशन चे वतीने प्रताप मारोडे, विवेक वानखडे, सीमा उमाळे, नैना चिंचे, तुळशीराम लोथे, प्रफ्फुल गुजारे, विनोद डीवरे, नागोराव सोंनकर आदी जण गावा गावात जाऊन नागरिकांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत. या कार्याला जोडीदार म्हणून भारतीय जैन संघटना ही मशीन चे माध्यमातून काम करताना दिसत आहे. दुष्काळ मुक्तसाठी हे रणकंदन तालुक्याचे समृद्धीचे द्योतक ठरावे हीच अपेक्षा!

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Water cup competion of pani foundation in sangrampur buldhana