नादुरुस्त वाहिनीमुळे पाणीच पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

नागपूर : शहरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) विविध वॉर्डांमध्ये पाणी तुंबले आहे. विशेष म्हणजे मेडिकलमधील नादुरुस्त सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यामुळे घाण तसेच दुर्गंधीयुक्त पाणी वऱ्हांड्यासह वॉर्डात शिरले. याशिवाय छताला गळती लागली असून, भिंतींना ओलावा आला आहे. यामुळे शॉर्टसर्किटची भीती आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून छताला गळती लागली नसल्याचा दावा केला जात आहे.

मेडिकलमध्ये तळमजल्यावरील अतिदक्षता वॉर्डापासून तर बालरोग विभाग, महिला विभागाचे तसेच मेडिसीन विभागाच्या वॉर्डाच्या भिंतींना ओलावा आला आहे. तर तिसऱ्या माळ्यावरील सर्व वॉर्डातील छतांना गळती लागली असल्याची माहिती खुद्द रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली. मेडिकलच्या पुढे असलेल्या महापालिकेच्या सांडपाण्याच्या नादुरुस्त वाहिनीमुळे मेडिकलच्या आकस्मिक विभागासह आजूबाजूला मुसळधार पावसामुळे पाणी तुंबले आहे. याचा रुग्णांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. मेडिकलच्या एक्‍स रे विभाग आणि रेडिओथेरपी विभागासमोरच्या भागात नेहमीच छत गळत असते. या भागात रुग्णांची तपासणीसाठी सातत्याने गर्दी असते, यामुळे कधीही अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता आहे.
मेयोतही हीच स्थिती
मेयो रुग्णालयातील जुन्या इमारतीमधील वॉर्डांची हीच स्थिती आहे. अनेक वॉर्डांच्या समोर पाणी तुंबते. भिंतीना ओलावा येतो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ कामाच्या देखभालीचा देखावा केला जात असल्याची तक्रार इंटकने केली आहे. दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मेडिकल, मेयोच्या देखभाल-दुरुस्तीवर केला जातो, मात्र दरवर्षी पावसाळ्यात गळती कायम असते.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water due to faulty channels

फोटो गॅलरी