शहरावर अभूतपूर्व पाणीटंचाईचे संकट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

नागपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच तोतलाडोह येथील पाण्याचा साठा संपला आहे. नवेगाव खैरी येथे फक्त 23 टक्के साठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईचे संकट भीषण होत चालले आहे. पाऊस आणखी लांबल्यास जिल्ह्याला अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
मॉनसूनचा जून महिना कोरडा गेला. एक, दोन तुरळक पावसाचा अपवादवगळता जुलै महिन्याचे दोन आठवडे उलटल्यानंतरही पावसाचा पत्ता नाही. आणखी पाच दिवस पाऊस येण्याची कुठलीच शक्‍यता नसल्याचे हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला आहे. दुसरीकडे दमट वातावरणाचाही त्रास नागपूरकरांना सहन करावा लागत आहे.

मागील वर्षीसुद्धा जिल्ह्यात अपुराच पाऊस पडला होता. त्यात मध्य प्रदेशने पेंच नदीवर धरण बांधल्याने नागपूरला पाणीपुरवठा करणारे तोतलाडोहसुद्धा भरले नव्हते. याहीवर्षी नागपूर जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशात अद्याप दमदर पाऊस बरसलेला नाही. या भागात यंदा बेताचाच पाऊस पडल्यास नागपूरकरांना प्यायलाही पाणी मिळणार नाही. मध्य प्रदेशातून वाहणाऱ्या नद्या नागपूरमार्गे पुढे जातात. पेंच नदीचे पाणी तोतलाडोह येथे अडविण्यात येते. कन्हान नदीचेही पाणी पिण्यासाठी वापरल्या जाते. यंदा कन्हानही कोरडी पडली आहे. सध्या मृतसाठा वापरून नागपूरकरांची तहाण भागविली जात आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास हा साठाही दिवसेंदिवस घटत चालला आहे. सध्या पेंच तोतलाडोह येथे पाण्याचा साठा शून्य टक्के आहे. नवेगावर खैरीमध्ये 23.80 टक्के एवढाच साठा शिल्लक आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water scarcity crisis in the city