पाण्यासाठी काँग्रेसची मनपावर धडक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मार्च 2019

नागपूर - शहराला पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, अनेक भागातील नळांना पाणी येत नसल्याने त्रस्त नागरिकांसोबत शहर काँग्रेसने आज महापालिकेवर धडक दिली. प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करताना नगरसेवक, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ फोडले. संतप्त नगरसेवक, नागरिकांनी घोषणाबाजी करीत सत्ताधाऱ्यांवरही तोंडसुख घेतले.

नागपूर - शहराला पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, अनेक भागातील नळांना पाणी येत नसल्याने त्रस्त नागरिकांसोबत शहर काँग्रेसने आज महापालिकेवर धडक दिली. प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करताना नगरसेवक, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ फोडले. संतप्त नगरसेवक, नागरिकांनी घोषणाबाजी करीत सत्ताधाऱ्यांवरही तोंडसुख घेतले.

शहराच्या कुठल्या ना कुठल्या भागात दररोज पाणीटंचाईची स्थिती आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून, प्रशासनाच्या उद्दामपणाविरुद्ध आज शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर, प्रदेश प्रतिनिधी ॲड. अभिजित वंजारी, नगरसेवक सर्वश्री संदीप सहारे, रमेश पुणेकर, मनोज सांगोळे, हरीश ग्वालवंशी, नितीश ग्वालवंशी, नगरसेविका दर्शनी धवड, रश्‍मी धुर्वे, उज्ज्वला बनकर, स्नेहा निकोसे, हर्षला साबळे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, ॲड. नंदा पराते, भावना लोणारे, जयंत लुटे, सुजाता कोंबाडे, ईरशाद अली, मिलिंद सोनटक्के, नेहा सेजूळ, अनिल पांडे, सेवादलाचे अध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे, रमण पैगवार, गुड्डू तिवारी, दीपक वानखेडे, अशरफ खान, प्रशांत कापसे यांनी नागरिक, कार्यकर्त्यांसह महापालिकेत घोषणाबाजी केली. मनपा प्रवेशद्वाराजवळ माठ फोडून त्यांनी प्रशासनाचा निषेध केला. यानंतर ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. 

शहरातील पाणी समस्येसोबतच मालमत्ता करातील वाढ, स्वच्छता, कनक रिसोर्सेसकडून कचरा उचलला जात नसल्याबाबत आयुक्तांना सांगितले. यावेळी खासगी कंपन्यांमुळे नागपूरकरांना फटका बसत असूनही प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. माठ फोडण्याच्या आंदोलनात पंकज निघोट, पंकज थोरात, आकाश तायवाडे, राजेश पौनीकर, विवेक निकोसे, छाया सुखदेवे, रिचा जैन, वीणा बेलगे, अतिक मलिक, अब्दुल शकील, किशोर गीद, सुनीता ढोले, रवी गाडगे, ॲड. अशोक यावले, राजेश कुंभलकर,अभिजित ठाकरे, संजना देशमुख, वसीम खान, स्नेहल दहीकर, तनवीर अहमद, राकेश पन्नासे, ॲड. अभय रणदिवे, स्नेहल दहीकर, गोपाल पट्टम, प्रसन्ना बोरकर, मामा गावंडे, विनायक इंगोले, जयंत दियेवार, रॉबर्ट वंजारी, मंगेश कामोने, विशाल वाघमारे, दुर्गेश मसराम, राहुल जगताप, अजय नासरे, मिलिंद सोनटक्के, चंदू वाकोडीकर, संजय सरायकर आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage Agitation