विकतच्या पाण्यामुळे मासिक बजेटमध्ये ८ ते १० हजारांची वाढ  

water
water

खामगाव : शहरात यावर्षी भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याने वापर व पिण्यासाठी नागरीकांना टँकरचे पाणी, आरओ कॅन परिणामी  खामगावकरांच्या बजेटमध्ये  दरमहा ८ ते १० हजारांची वाढ झाली. 'दुष्काळात तेरावा महिना' या उक्तीचा प्रत्यय खामगावकर घेत आहेत.

एक लाखावर लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराला नगर पालिका प्रशासन नळ योजनेद्वारे गेरु माटरगाव धरणावरुन पाणी पुरवठा करते. मात्र या धरणातील पाणी संपले असल्याने पाणी पुरवठा नियमित करण्यास अडचणी येत आहेत. शहरातील भुगर्भातील पाणी पातळी खोल गेली असल्याने विहिरी, विंधन विहिरी, हातपंप आटले आहेत. परिणामी नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. दोनशे ते दोन हजार रुपये प्रति टँकर असे पाण्याचे दर सुरु आहेत. एका कुटूंबाला दिवसाला एक छोटे टँकर पाणी लागते. मोठे कुटूंब, व्यवसायीक, हॉटेल्स, हॉस्पीटल यांच्याकरीता दिवसाला २ हजार रुपये मोजुन टँकर बोलवावे लागत आहे.  सामान्य कुटूंबाना वापरासाठी ८ ते १० हजार रुपये महिना पाणी विकत घ्यावे लागत आहे. पिण्याच्या आरओ कॅनचा दर ३० ते ३५ रुपये असून दररोज १ कॅन पकडली तरी महिन्याला १ हजार रुपये लागतात. शहरातील काही वस्त्यांमध्ये सामाजिक संस्थांद्वारे मोफत पाणी वाटप केले जात आहे. परंतु त्याला मर्यादा असल्याने अनेकांना विकतचे पाणी हाच एकमेव पर्याय आहे. पाणी टंचाईच्या दाहकतेने सध्या खामगावकर हैराण झालेले आहेत. 

आमच्या सोसायटीमधील विहिर व विंधन विहिर आटल्या आहेत. ३४ घरे असलेल्या घाटपुरी नाका भागातील कुलस्वामिनी अपार्टमेंट सोसायटीमध्ये दररोज टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी आरओ कॅन प्रत्येक घरात लागल्या आहेत. विकत पाणी घ्यावे लागत असल्यामुळे आमचे महिन्याचे बजेट ८ ते १० हजारांनी वाढले आहे.
- गोपाल उन्हाळे, रहिवासी कुलस्वामिनी अपार्टमेंट, खामगाव

सुलभ शौचालय महागले
बसस्थानकावरील व अन्य सुलभ शौचालय ठेकेदारी पध्दतीने चालविल्या जातात. त्यांना सुध्दा टँंकरचे विकतचे पाणी घ्यावे लागते. त्यामुळे सुलभ शौचालयांनीही आपले दर वाढविले आहेत. बसस्थानकावरील शौचालय वापरासाठी आता १० रुपये घेतल्या जातात. पुर्वी २ ते  ५ रुपये घेतल्या जात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com