ढाणकीत महिन्यातून दोनदाच पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

ढाणकी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतरही नागरिकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांत काहीच फरक पडला नाही. उलट ढाणकीत आता महिन्यातून केवळ दोनदाच आणि तेही अर्धा तासच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. म्हणून आपली तहान भागविण्यासाठी नागरिकांना विशेषतः महिलांना लेकरांसह शहरालगतच्या शेतशिवारात हंडा घेऊन भटकंती करावी लागत आहे.

ढाणकीतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तरीदेखील या भागातील लोकप्रतिनिधींसह प्रशासनदेखील अजूनही कुंभकर्ण झोपेत आहे. महिनाभरात फक्त दोनदाच नळयोजनेतून अर्धा तास पाणी मिळते. परंतु, ढाणकीचा तुघलकी कारभार संपूर्ण वर्षभराची पाणीपट्टी वसूल करीत आहेत. नादुरुस्त कूपनलिकेची दुरुस्ती नागरिक स्वखर्चातून करतात. वॉर्डातील तरुणांनी पुढाकार घेऊन हातपंप दुरुस्त केला. कारण प्रशासनाने ढाणकीचा कारभारच वाऱ्यावर सोडला आहे. खरंतर पावसाळ्यात छताच्या पाण्यावर काही प्रमाणात सांडपाण्याचा प्रश्न मिटायचा, आता तर वरुणराजाही काही दिवसांपासून रुसल्याने ढाणकीकरांवरील संकट अधिक गडद झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply twice a month to Dhankit