esakal | छोट्या औषध दुकानांवरील साठा समाप्तीच्या मार्गावर
sakal

बोलून बातमी शोधा

On the way to closing stocks at small drugstores

जीवनावश्यक वस्तूंमध्ये औषधांचा समावेश आहे. त्यामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील औषध विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास संचारबंदीतही मंजुरी देण्यात आली आहे. मात्र शहरातील अनेक छोट्या औषध विक्रेत्यांकडील साठा समाप्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळे दैनंदिन लागणारी औषधही मिळेनासे झाली आहे.

छोट्या औषध दुकानांवरील साठा समाप्तीच्या मार्गावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जीवनावश्यक वस्तूंमध्ये औषधांचा समावेश आहे. त्यामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील औषध विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास संचारबंदीतही मंजुरी देण्यात आली आहे. मात्र शहरातील अनेक छोट्या औषध विक्रेत्यांकडील साठा समाप्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळे दैनंदिन लागणारी औषधही मिळेनासे झाली आहे.


माल वाहतूक होत नसल्याने औषधे विक्रेत्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यातच ठोक औषध बाजारातून चढ्या दराने औषद विक्री होत असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी ती घेण्यास नकार दिला आहे. परिणामी येत्या काही दिवसात टप्प्प्याने शहारातील किरोकळ औषद विक्रीची दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. विशेषतः जेनरिक औषधांचा माल हा राज्यातील महानगरांमधून अकोल्यात येतो. या महानगरांच्या सीमा सिल करण्यात आल्या आहेत. अकोला जिल्ह्याच्या सीमेवरही कडेकोड बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे जेनरिक औषध विक्रेत्यांसह किरोळ औषध विक्रेत्यांनी थेट औषध कंपन्यांकडे औषधांची मागणी केली असूनही माल जिल्ह्यात पोहोचत नसल्याने सध्या उपलब्ध असलेला औषध साठा संपन्याच्या मार्गावर आहे.

टप्प्या टप्प्याने होतील औषध दुकाने बंद
जिल्ह्यासह संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे औषध विक्रेत्यांपुढील अडचणी वाढतच आहे. सध्या उपलब्ध असलेली औषधे संपन्याच्या मार्गावर आहे. नियमित ग्राहकांना औषधे पुरविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शहरातील जेनरिक औषधांची दुकाने टप्प्याने बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

फार्मासिस्टची पाठ
कोरोना विषाणूची धास्ती, संचारबंदी असल्याने पोलिसांनाकडून होत असलेला बळाचा वापर यामुळे औषध विक्रेत्यांकडील फार्मासिस्ट यांनी दुकानात येण्याचे टाळणे सुरू केले आहे. त्यामुळे औषधे देण्यासाठी दुकानात कुणीही उपलब्ध होत नाही. त्यामुळेही किरकोळ औषध विक्रेत्यांना आता त्यांची दुकाने टप्प्याने बंद करण्याची वेळ आली आहे.