आम्ही नागपूरला केले स्वच्छ व सुंदर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

नागपूर - महापालिकेने शहराला स्वच्छ व सुंदर केले. शहरात कुणी उघड्यावर शौचाला जात नाही. कचऱ्याच्या संकलनापासून तर विल्हेवाटीपर्यंत राबविलेल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज "टॉप टेन' शहराची निवड करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर सादर केली. 

नागपूर - महापालिकेने शहराला स्वच्छ व सुंदर केले. शहरात कुणी उघड्यावर शौचाला जात नाही. कचऱ्याच्या संकलनापासून तर विल्हेवाटीपर्यंत राबविलेल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज "टॉप टेन' शहराची निवड करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर सादर केली. 

आयुक्तांचे "प्रेझेंटेशन' बघून केंद्रीय पथक चांगलेच प्रभावित झाले असले तरी दोन दिवस विविध स्थळे आणि प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन पथक याची खातरजमा करणार आहे. पथकांमार्फत दिल्या जाणाऱ्या गुणांवरच शहराचे स्मार्टनेस सिद्ध होणार आहे. आयुक्तांनी पॉवर पॉइंटच्या माध्यमातून केंद्रीय पथकासमोर प्रभाग पूर्णत: उघड्यावरील शौचापासून मुक्त झाल्याचे स्पष्ट केले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सार्वजनिक शौचालये, वैयक्तिक शौचालय, मोबाईल टॉयलेट तसेच महिलांसाठी शहरात किती शौचालये उपलब्ध आहेत याची आकडेवारी दिली. तसेच कचऱ्याची विल्हेवाट, घराघरांतून होणारा कचरा संकलन, वाहतूक व कचऱ्यावरील प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. 

"सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट' प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्लांट, स्वच्छता ऍप जनजागृतीपर प्रसार आणि प्रचार, स्वच्छता ऍपद्वारे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, ई-लर्निंगचा उपक्रम, गणेश व दुर्गा उत्सवादरम्यान निर्माल्य गोळा करण्याचे तसेच मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती, यासारखे इको-फ्रेण्डली उपक्रम यासोबतच नागनदी, पिवळीनदी व पोरा नदी स्वच्छता अभियानाची माहिती दिली. मैत्री परिवाराच्या सहयोगातून राबविण्यात येणारे ई-कचरा संकलन अभियान, दर आठवड्यात शहरात व झोननिहाय केले जाणारे श्रमदान आदी विविध उपक्रम मनपा हे विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून राबविले जाणारे उपक्रम याचीही माहिती आयुक्तांनी दिली. टाकाऊ प्लास्टिकचा वापर करून रस्ता तयार करण्याचा पथदर्शी प्रयोग भांडेवाडी येथे महापालिकेमार्फत सुरू केला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पथक तीन दिवस शहराच्या विविध भागांत भेट देऊन त्यांची निरीक्षणे नोंदवणार आहेत.

Web Title: We have a clean and beautiful Nagpur