कचरा संकलनाचे काम आम्हालाच मिळावे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपुर  : मागील दहा वर्षांपासून शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ठेकेदारामार्फत कनक संस्थेकडे होती. या संस्थेचा कार्यकाळ संपला आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाने नव्याने निविदा काढली आहे. याविरोधात कनकने न्यायालयामध्ये याचिका दाखल करीत हे काम आमच्याकडेच कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

कनक समूह मागील दहा वर्षांपासून विविध नावाचा उपयोग करून शहरातील कचऱ्याचे संकलन करण्याचे काम करीत होता. एकाच ठेकेदार कंपनीकडून काम होत असल्याने नागरिकांना विविध समस्या भेडसावत होत्या. वाढत्या लोकसंख्येचा विचार करीत प्रशासनाने एका संस्थेऐवजी दोन संस्थांची निविदा यासाठी काढली. त्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला गेला. यामध्ये कनकसह तीन कंपन्यांनी आपल्या निविदा दाखल केल्या. दरम्यान, कनक संस्थेने हा ठेका आपल्याकडे कायम राहावा, अशी मागणी करीत न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिका प्रशासन पुढील कारवाई करेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We have to get the job done