Theft News | पीपीई किट घालून देशीदारू दुकानात चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

theft from liquor shop

पीपीई किट घालून देशीदारू दुकानात चोरी

धारणी : मेळघाटच्या धारणी तालुक्यात चोरीच्या विविध घटनांची मालिकी सुरूच आहे. त्यातच एका चोरट्याने चक्क पीपीई किट घालून एका दारूच्या दुकानात चोरी केल्याची धक्कादायक घटना येथे उजेडात आली.

हेही वाचा: हालचाली वाढल्या; नितेश राणेंचे पीए राकेश परब पोलिसांना शरण

कलमखार येथील देशीदारू दुकानात हा चोरटा मध्यरात्री शिरला. त्याने सीसीटीव्हीचे डिव्हिआर, एलसीडी व रोख रक्कम लंपास केली. दुकानात चोरी करणार चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपल्या गेला. दुकानाचे मालक विशाल मालवीय व दुकानाचे मॅनेजर यांच्या मोबाईलमध्ये सीसीटीव्ही फुटेज येत असल्याने त्यावरून या चोरीचा सुगावा लागला. दुकानात शिरलेल्या चोरट्याने संपूर्ण पांढऱ्या रंगाची पीपीई किट व मास्क घातलेला दिसत आहे.

हेही वाचा: अर्थसंकल्पीय अधिवेशन : देशाच्या प्रगतीसाठी चर्चा करावी - PM मोदी

त्यामुळे स्वतःची ओळख लपविण्यासाठी चोरट्यांनी आता नवी शक्कल लढविल्याचे दिसून येत आहे. शहरी भागात अशा स्वरूपाच्या आयडिया लढविण्यात येत असताना आता ग्रामीण भागातसुद्धा चोरटे विविध शक्कल लढवून दुकाने फोडत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे. चोरट्याने ४० हजार रुपये नगदी, सुमारे ३० हजार रुपयांचा एसलीडी व डिव्हिआर, असा अंदाजे एक लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती आहे.

Web Title: Wearing Ppe Kit And Theft From Liquor Store Shop

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top