वऱ्हाडी घेऊन जाणारा ट्रक उलटला; तीन गंभीर जखमी, दहा किरकोळ; गोंडमोहाळी फाट्याजवळ अपघात

लग्न झाल्यानंतर आंदणासह वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा आयशर ट्रक उलटला. या अपघातात दहा वऱ्हाडी जखमी झाले.
wedding bridegroom truck overturned 13 people injured accident Gondmohali
wedding bridegroom truck overturned 13 people injured accident Gondmohali Sakal

चिमूर : लग्न झाल्यानंतर आंदणासह वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा आयशर ट्रक उलटला. या अपघातात दहा वऱ्हाडी जखमी झाले. यातील तीन गंभीर जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. अपघाताची ही घटना गुरुवार (ता. २५) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गोंडमोहाळी फाट्याजवळ घडली.

चिमूर तालुक्यातील शिरपूर येथील पुरुषोत्तम शेंदरे यांचा मुलाचा पळसगाव येथील सुधाकर वघारे यांच्या मुलीसोबत गुरुवारी विवाह होता. लग्नानंतर आयशर ट्रकने आंदनासह दहा वऱ्हाडी शिरपूरकडे निघाले.

गोंडमोहाळी फाटकाजवळ उतार मार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे ट्रक उलटला. या अपघातात अक्षय भानारकर (वय ३० रा. शिरपूर), सोनबा वगारे (वय ६५ रा. शिरपूर), लता नेवारे (वय ३२ रा.शिरकाडा ता. सिंदेवाही),

प्रणय आडे (वय १७ रा. शिरपूर), सलोनी लोहट (वय सात रा. ओवाळा, ता.नागभीड), गीता लोहट (वय २५ रा.ओवाळा ता. नागभीड), अशोक शेंद्रे (वय ३०रा.शिरपूर), निखिल लोहट (वय नऊ रा. ओवाळा, ता. नागभीड), मंगला नेवारे (वय १३ रा. मांगली ता. सिंदेवाही), कांता नेवारे (वय ४० रा.मांगली, ता. सिंदेवाही) हे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश लोखंडे आणि कर्मचाऱ्यांनी जखमींवर प्रथमोपचार केले.

वृद्ध सोनबा वघारे, अक्षय भानारकर आणि लता नेवारे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले. अपघातात नवरी मुलीला मिळालेल्या आंदनाची मोठी मोडतोड झाली.अपघाताची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली. घटना स्थळावर पोलिस उपनिरीक्षक दीपक ठाकरे यांनी पोलिस कर्मचाऱ्यासह पोहोचून पंचनामा केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com